आष्टा – “समाजभान असलेला शिक्षकच खरी शिक्षणक्रांती घडवतो,” याचे प्रेरणादायी उदाहरण प्रा.रोहित रमेश मोहेकर यांनी आपल्या कृतीतून साकारले. शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त,त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘वही तुला’ उपक्रमांतर्गत विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा (ता. भूम,जि.धाराशिव) येथे गरजू, होतकरू व अनाथ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर आणि प्रशासकीय अधिकारी तथा माजी सरपंच रमेश (भाऊ) मोहेकर यांची ‘वही तुला’ करण्यात आली. त्यांच्या सन्मानार्थ एकत्रित जमा झालेल्या वह्यांचे वाटप संस्थेच्या विविध शाखांच्या प्रमुखांना करण्यात आले. दिनांक २८ जुलै २०२५ रोजी झालेल्या मुख्य कार्यक्रमात,वितरित वह्यांचे वाटप प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी विद्यालयातील सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.रोहित मोहेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधार ठरला असून, विद्यालयाच्यावतीने प्रा.रोहीत मोहेकर व मोहेकर कुटुंबीयांचे विशेष आभार मानण्यात आले. हा उपक्रम समाजात शिक्षकांची सामाजिक भूमिका अधोरेखित करणारा ठरला आहे.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
डॉ.अण्णाभाऊ साठे यांना विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अभिवादन