येरमाळा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची ९८ व्या जयंतीनिमित्त दि.२७ जुलै २०२५ वार रविवार रोजी ज्ञान प्रसारक मंडळ संचलित ज्ञानोद्योग विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजींच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब (अप्पा) बारकुल व ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळाचे कोषाध्यक्ष अंकुश (बप्पा) पाटील,मुख्याध्यापक प्रा.सुनिल पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल व प्रमुख पाहुणे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कोषाध्यक्ष अंकुश पाटील हे होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक मु.अ.प्रा.सुनिल पाटील यांनी केले.तसेच प्रा.सुशिल शेळके यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजीच्या,शिक्षण क्षेञातील पविञ कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली अध्यक्षसमारोप झाला.या कार्यक्रमाचे सूञसंचालन दिलीप मोरे यांनी केले,तर आभार श्रीमती सिना सिरसट यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले