आष्टा – भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये दि.१० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील सहाय्यक शिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे, सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव, बबन यादव यांच्यासह अन्य शिक्षकवृंदांनीही प्रतिमेला पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामुळे गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आले असून, शाळेतील वातावरण भक्तिभाव व प्रेरणादायी विचारांनी भरले होते.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
प्रा.रोहित मोहेकर यांच्या संकल्पनेतून विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप