कळंब (विशाल पवार) – विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा मोठ्या श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी साक्षी पावनज्योत साप्ताहिकाचे उपसंपादक अरविंद शिंदे व मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमावेळी उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका कोळी,तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी श्रद्धेने गुरूंना अभिवादन केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी