कळंब – युवक काँग्रेस कळंब शहर अध्यक्षपदी इरफान रफिक बागवान यांची नियुक्ती करण्यात आली.ही निवड काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांच्या संपर्क कार्यालयात,दिनांक ८ जुलै २०२५ रोजी,काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत पार पडली. या निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,आ.अमित विलासराव देशमुख,युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष धिरज पाटील, जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार व विधानसभा अध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या नेतृत्वात निर्णय घेण्यात आला. नियुक्तीनंतर तालुका अध्यक्ष पांडुरंग (तात्या) कुंभार यांनी सांगितले की,”काँग्रेस पक्षाचे विचार व धोरणे गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी व पक्षवाढीसाठी इरफान बागवान यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.” निवडीचे पत्र तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पांडुरंग कुंभार व शहराध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी कळंब शहर कार्याध्यक्ष सचिन गायकवाड,अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष शाहजान शिकीलगार,विधानसभा उपाध्यक्ष युवक काँग्रेस रोहित कसबे तसेच वसीम बागवान,बबलू बागवान, बाबु बागवान,समीर बागवान, राजू बागवान,मुक्तार बागवान,सलमान बागवान,खालील बागवान,जाकिर बागवान,निहाल बागवान,शाखेर बागवान,सद्दाम बागवान,जावेद बागवान,गौस बागवान,शाहरुख बागवान,अली बागवान,आलिम बागवान,साहिल बागवान,शोहेब बागवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते. इरफान बागवान यांच्या निवडीमुळे कळंब शहरात युवक काँग्रेसच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर