March 26, 2026

माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेची नाळ;जय भवानी विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन व खाऊ वाटप

  • पारा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा येथील कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय,पारा जि.धाराशिव येथे माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भेट देत सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले.
    या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करणे,सातत्य,शिस्त व मेहनतीचे महत्त्व याबाबत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.
    यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी असलेली आपुलकी व कृतज्ञता मनोगतातून व्यक्त केली. “आई-वडिलांनंतर गुरुजनच खरे हितचिंतक असतात,” हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
    कार्यक्रमात विनायक जयंतराव पानसे (एसएससी मार्च २०१६ गुणवंत विद्यार्थी) यांचा प्रशालेतर्फे हार,पुष्पगुच्छ,फेटा व शाल देऊन गौरव करण्यात आला.“इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जय भवानी विद्यालयात झाल्यामुळेच आजच्या यशाला दिशा मिळाली,”असे त्यांनी मनोगतात सांगितले.सध्या ते इंजिनिअरिंग पदवीधर असून पुणे येथील INDOVANCE या नामांकित कंपनीत कार्यरत आहेत.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक संदीप भराटे यांनी केले.
    यावेळी विकास माळी,दीपक मुळे, अमोल बांगर यांनी मनोगते व्यक्त केली.तसेच शहाजी सोलंकर, शितल मेटे,सतीश वाघमारे,दीपक मुरकुटे,अमोल गवळी,तुषार डमरे, अतुल गवळी आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!