March 26, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना जय भवानी विद्यालयात अभिवादन

  • प्रेरणादायी कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
  • पारा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय,पारा ता. वाशी येथे दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी (वार गुरुवार) संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले.“सर्वांसाठी शिक्षण” ही त्यांची भूमिका आजही प्रेरणादायी ठरते.त्यांच्या विचारांतून शिक्षक व विद्यार्थ्यांना कर्तव्यनिष्ठा,प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची जाणीव जागृत होते.
    या अभिवादन कार्यक्रमात प्रशालेतील सहशिक्षिका श्रीमती शितल मेटे तसेच शिक्षकवृंद संदीप भराटे,सतीश वाघमारे,दीपक मुरकुटे,विकास माळी,दीपक कुळे, अतुल गवळी,तुषार डमरे यांच्यासह सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची जिद्द व मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीचा संदेश दृढपणे पोहोचला.
error: Content is protected !!