August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.12 जुन रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 328 कारवाया करुन 2,60,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • बेंबळी पोलीस ठाणे: आरोपी नामे-पांडुरंग अंबादास ढाळे, वय 33 वर्षे, रा. महाळंगी ता. जि. धाराशिव हे दि.12.06.2025 रोजी 11.35 वा. सु महाळंग हॉटेल प्रिस्टीज येथे अंदाजे 1,400 ₹ किमंतीच्या देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-रामभाउ हरीभाउ पवार, वय 50 वर्षे, रा. घारगाव तांडा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.12.06.2025 रोजी 12.15 वा. सु घारगाव तांडा येथे अंदाजे 40,500 ₹ किमंतीचे 1000 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 5 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-नंदा रमेश पवार, वय 49 वर्षे, रा. भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.12.06.2025 रोजी 16.40 वा. सु आपल्या राहत्या घराचे समोर अंदाजे 5,550 ₹ किमंतीची 45 लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-गौतम काका सिरसाठे, वय 40 वर्षे, रा. भिमनगर धाराशिव ह.मु. तुळजाई नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.12.06.2025 रोजी 18.45 वा. सु अक्षय मेटल उड्डाणपुलाचे पश्चिम बाजूस तुळजाई नगर येथे अंदाजे 720 ₹ किमंतीची 07 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • स्थानिक गुन्हे शाखा :जुगार विरोधी कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि.12.06.2025 रोजी 11.45 वा. सु. नळदुर्ग पो ठाणे हद्दीत ईटकळ ते सोलापूर रोडलगत टपरीच्या बाजूला ईटकळ येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-हुसेन अल्लाउद्दीन शेख, वय 38 वर्षे, रा. ईटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 11.45 वा. सु. ईटकळ ते सोलापूर रोडलगत टपरीच्या बाजूला ईटकळ येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,700 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराढोण पोलीसांनी दि.12.06.2025 रोजी 14.30 वा. सु. शिराढोण पो ठाणे हद्दीत रांजणी येथील जायफळ रोडच्या बाजूला टपरीच्या पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- सिद्दीक जानुमिया बागवान, वय 35 वर्षे, रा. रांजणी ता.कळंब जि. धाराशिव हे 14.30 वा. सु. रांजणी येथील जायफळ रोडच्या बाजूला टपरीच्या पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 4,100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले शिराढोण पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.12.06.2025 रोजी 20.00 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत सांजा जाणारे रोडचे उजवे बाजूस तांबोळी किराणा स्टोअर्स समोर धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-श्रीकांत भिमराव गायकवाड, वय 32 वर्षे, रा. राघुचीवाडी ता. जि. धाराशिव हे 20.00 वा. सु. सांजा जाणारे रोडचे उजवे बाजूस तांबोळी किराणा स्टोअर्स समोर धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 1,160 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणुक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-सलमान असलम सय्यद, वय 27 वर्षे, रा. शहाजी नगर, बारामती रोड, इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे यांनी दि.11.06.2025 रोजी 23.00 वा.सु.येडशी टोल नाका येथे पिकअप क्र एमएच 42 बी 4203 मध्ये गोवंशीय जातीचे 42 जर्शी गायीचे वासरे एकुण 33,600₹ किंमतीचे वाहनासह एकुण 2,33,600 ₹ किंमतीचे गोवंशीय वासरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या वाहतुक करताना धाराशिव ग्रामीण पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5, 5(अ), 5(ब), 9(अ), 11 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह मपोका कलम 119 सह प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(ड) (इ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मदन विठ्ठलराव दुधभाते, वय 65 वर्षे, रा.मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांचे मुळज शिवारातील शेतात पत्र्याचे शेडचा दरवाजा तीन अज्ञात व्यक्तींनी दि.11.06.2025 रोजी 01.30 वा. सु. उचकटुन शेडमधील सोयाबीनचे 8 बॅग व खताचे 1 पोते रोख रक्कम 2,500₹ असा एकुण 23,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मदन दुधभाते यांनी दि.12.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-शरद दत्तात्रय आखाडे, वय 37 वर्षे, रा.पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांचे पारगाव शिवारातील शेतात शेत गट नं 107(ड) मधील विहीरीवर बसवलेले सोलार पंप व वायर असा एकुण 17,000₹ किंमतीचे हे दि.01.06.2025 रोजी 18.00 ते दि.02.06.2025 रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. व सोलारच्या दोन प्लेट फोडून नुकसान केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शरद आखाडे यांनी दि.12.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), 324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे : दि.28.05.2025 रोजी 22.30 वा. पुर्वी नागेवाडी शिवारातील शेत गट नं 65(अ) मधील सहा पोल वरील 500 मिटर तारा एकुण 1,50,000₹ किंमतीच्या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. तसेच ताराचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल अश्रुबा मोटे, वय 40 वर्षे, रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.12.06.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), 324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “बलादगृहण.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-ज्ञानेश्वर दत्तात्रय बारकुल, अविनाश ज्ञानेश्वर बारकुल दोघे रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.11.05.2025 रोजी 12.30 ते दि.11.06.2025 रोजी 19.45 वा. सु. बांधकामावर येरमाळा येथे फिर्यादी नामे- रत्नमाला मारुती घोळवे, वय 43 वर्षे, रा. भगवान बाबानगर, एम.आय.डी.सी. धाराशिव ता. जि. धाराशिव यांना बांधकाम करु देण्यासाठी 30,00,000₹ ची खंडणीच्या स्वरुपात मागणी करुन फिर्यादीचे बांधकामावर येवून लोखंडी रॉड घेवून बांधकामावरील कामगारांना शिवीगाळ करुन काम बंद कर असे म्हणून शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रत्नमाला घोळवे यांनी दि.12.06.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम 308(3), 352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-संदीप भाउराव मोरे, रा. बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर, मन्नत रामलिंग तोडकरी, रा. बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.28.12.2024 रोजी 11.00 ते दि.20.01.2025 रोजी 20.00 वा. सु. सोनारवाडी ता. वाशी येथे फिर्यादी नामे- नारायण वैजीनाथ घोळवे, वय 68 वर्षे, रा.सोनारवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांचे व इतर शेतकऱ्यांकडून सोयाबीनचे 552 कट्टे अंदाजे 13,27,863₹ खरेदी करुन त्याचा मोबदला थोड्या दिवसाने देतो असे सांगुन नमुद रक्कमेची सोयाबीन अप्रामाणिकपणे घेवून न्यासभंग करुनघेवून जावून त्याचा मोबदला दिला नाही. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नारायण घोळवे यांनी दि.12.06.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे येरमाळा येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 316(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सविता सुबराव लांडगे, वय 59 वर्षे, रा. मोहेकर कॉलेज बाजूला दत्तनगर कळंब ह.मु. डेपोडील टी-31101 सोहम गार्डन मानपाडा ठाणे या दि. 12.06.2025 रोजी 10.45 वा. सु. कळंब ते येरमाळा रोडवर एम.एस. ई.बी सबस्टेशनच्या कोपऱ्यावर शासकीय विश्रामगृहाच्या कंपाउट वॉलजवळ कळंब येथुन दत्तमंदीर येथे जात असताना अनोळखी एक इसमाने आवाज दिला व तो म्हणाला की, माताजी यहॉ पे पदमा टीचर का मर्डर हुआ है, इसलिए हम यहाँपर ड्युटी पे है हम पुलीसवाले है असे म्हणून ओळखपत्र दाखवून तुमच्या गळ्यातील मंगळसुत्र काढुन ठेवा असे सांगुन आणखी एका अनोळखी ईसमाला बोलावून घेवून तुम्हीपण हातातील अंगठी काढुन खिशामध्ये ठेवा असे सांगुन बहाना करुन फिर्यादी हिस गळ्यातील मंगळसुत्र बॅगेत ठेवण्यास सांगुन तोतयागिरी करुन बॅगेतील 25 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र अंदाजे 2,20,000₹ किंमतीचे काढून घेवून मोटरसायकल घेवून थांबलेल्या इसमाच्या मोटरसायकलवर बसून पळून गेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सविता लांडगे यांनी दि.12.06.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे कळंब येथे भा.न्या.सं.कलम 319(2), 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!