कळंब – श्री क्षेत्र चाकरवाडी येथील संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडी यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.१० जून रोजी संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली महाराज मंदिर कसबा पेठ कळंब येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्त माऊली मंदिर फुलांनी सजवले होते तसेच पूजा,आरती व भजन गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी दक्षिण मुखी हनुमान भजनी मंडळाचे चत्रभुज आप्पा चोंदे,नागनाथ शेंडगे,प्रा. जगताप,शिवदास पिंगळे, बबनराव वाघमारे,रामदास जाधव,विठ्ठल टोणगे,बब्रुवान कोळपे,आप्पा हजगुडे,बंडू मुंडे, परिमाळा घुले,मैनाबाई माळी, नंदाबाई पांचाळ,शेंडगे ताई,धोंडूबाई पांचाळ,यांनी भजन गायन कार्यक्रमात सहभाग घेतला.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर