कळंब – पिंपळगाव (डोळा ) येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता गोपीचंद घोडके यांचा मुलगा सार्थक यांने नीट स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सार्थक यास ७२० पैकी ५४४ गुण मिळाले आहेत.ऑल इंडिया रँक १५१९६ एसी.सी.रँक ३३९ आहे. सार्थक हा लातूर येथील शाहू कॉलेज येथे इयत्ता ११ वी १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.सार्थक हा सा.साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष द.घोडके यांचा नातू आहे. सार्थकच्या उत्तुंग यशाबद्दल ह.भ.प महादेव महाराज आडसूळ, सामाजिक कार्यकर्ते बंडू ताटे,संपादक सुभाष घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत, काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,प्रा.अविनाश घोडके आदींनी अभिनंदन केले असून एम.बी.बी.एस साठी शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले