कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी कार्यरत असलेला, कळंब शहरातून प्रकाशित होणारा सा.साक्षी पावनज्योतचा ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव,शिक्षणतज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विशेषांक दिनांक ११ जून २०२५ रोजी,बुधवारी सकाळी ११ वाजता धाराशिव जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंके यांच्या हस्ते शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात उत्साहात प्रकाशित झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी राजेंद्र लांडगे,सा.साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष द.घोडके,सेवा योजना कार्यालयाचे प्रभारी शिक्षण अधिकारी संतोष माळी,भारत देवगुडे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, ह.भ.प.महादेव आडसूळ महाराज,प्राचार्य काकासाहेब मुंडे, प्रा.विलास आडसूळ,उपसंपादक माधवसिंग राजपूत,डॉ.कमलाकर जाधव, अरविंद शिंदे,सामाजिक कार्यकर्ते बंडू ताटे,प्रकाश भडंगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तालुक्यातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात सा.साक्षी पावनज्योतच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा गौरव करण्यात आला.उपस्थित सर्वांनी डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या दीर्घायुष्याच्या व यशस्वी कार्याच्या शुभेच्छा दिल्या.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले