धाराशिव (जिमाका)- पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १२ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यामुळे आता जिल्हा परिषद, धाराशिवच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आयोजित एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबीर १२ जून ऐवजी आता १६ जुन रोजी आयोजित करण्यात आले आहे. विविध उपक्रम तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दि.१६ जून रोजी स्थायी समिती सभागृह,जिल्हा परिषद, धाराशिव येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे,सकाळी १० वाजता पत्रकारांची नाव नोंदणी होईल.त्यानंतर १०.३० वाजता प्रास्ताविक सत्र होईल. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ.राठोड व डॉ.रवी चव्हाण हे पत्रकारांची आरोग्य तपासणी करतील.दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांकडून विविध शासकीय योजना व उपक्रमांची माहिती देणार आहे.त्यानंतर २ ते २.३० या वेळेत अल्पोहार व समारोप सत्र होईल. या आरोग्य तपासणी शिबीर व कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला