August 9, 2025

अध्यापक विद्यालयाच्या प्रवेशाचा वनवास 14 वर्षानंतर संपला

  • 14 वर्षात प्रथमच विद्यार्थी संख्येपेक्षा फॉर्मची संख्या जास्त
  • धाराशिव – गेल्या 14 वर्षापासून अध्यापक विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा ओढा कमी झाला होता. मात्र शासनाने सलग तीन वर्ष केलेल्या शिक्षक भरतीमुळे व मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेमुळे गाव गावातील मुले ही दहा हजार मानधनावरती काम करू लागले या गोष्टींचा परिणाम अध्यापक विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेवर झाला असून गेल्या 14 वर्षात कधी नव्हे ते विद्यार्थी संख्येपेक्षा फॉर्म ची संख्या ही जास्त झाली आहे विशेष म्हणजे दरवर्षी फॉर्म भरण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली जाते मात्र यावर्षी एकदाच मुदतवाढ दिलेल्या पहिल्याच दिवशी अध्यापक विद्यालयात प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त झाली आहे.
  • 2024.25 मध्ये राज्यात एकूण 571अध्यापक विद्यालय असून त्यापैकी 458 कार्यरत होती. या अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी संख्या जवळपास 22 हजार 900 एवढी आहे तर अनुदानित अध्यापक विद्यालयातील संख्या ही चार हजाराच्या आसपास आहे.त्यामुळं राज्यात 27000 हजार विद्यार्थी एवढी प्रवेश क्षमता आहे. मात्र आज प्राध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 28 हजाराच्या आसपास आहे त्यामुळे गेल्या 14 वर्षात 2011 नंतर पहिल्यांदाच एकूण विद्यार्थी क्षमतेपेक्षा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या आवेदन पत्राची संख्या ही जास्त झालेली आहे
    त्यामुळे रामायणात ज्याप्रमाणे 14 वर्षानंतर वनवास भोगून आले आणि राज्य केले त्या पद्धतीने पुन्हा एकदा अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक प्राचार्य व संस्थापक हे पुन्हा वाढलेल्या आनंदी दिसत आहेत.
error: Content is protected !!