August 8, 2025

महाराष्ट्र सरकार “आदिशक्ती अभियान ” राबवणार – सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे

  • बीड – महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून,सन २०२५-२६ पासून राज्यात “आदिशक्ती अभियान” राबवण्यात येणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्या सोडवून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम बनविणे.या अभियानाअंतर्गत ग्रामस्तर ते राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करून,प्रत्येक ग्रामपंचायतीने अनिवार्य सहभाग नोंदवायचा आहे.पुढील १५ दिवसांत ग्रामसभांच्या माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.असे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी सांगितले आहे.
    राज्याची सुमारे ६०% लोकसंख्या महिला व बालकांचीच आहे.त्यांच्यापर्यंत शासनाच्या सर्व योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविणे, हा “आदिशक्ती अभियान ” चा मुख्य हेतु आहे.
    या अभियानातून आपल्याला काय साध्य करायचे आहे –
    हुंडा आणि बालविवाह यांसारख्या अनिष्ठ प्रथांचे समुळ उच्चाटन केले जाईल,एकल महिला,विधवा,परित्यक्ता यांच्यासाठी संरक्षण आणि मदतीची यंत्रणा उभारली जाईल,महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनास चालना दिली जाईल,महिलांना ITI व कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल,कायदे,योजना व अधिकार याबाबत जनजागृती केली जाईल,बाल संरक्षण,पोषण, आरोग्य व शिक्षण समित्यांद्वारे सर्वसमावेशक विकास साधला जाईल,किशोरींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी समित्या काम करतील,पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत वृक्षलागवड व त्यांचे संगोपन ग्रामपंचायतीकडून केले जाईल.
    या अभियानाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आदिशक्ती पुरस्कार ” दिले जातील- तालुकास्तर : प्रथम ₹१ लाख, द्वितीय ₹५० हजार, तृतीय ₹२५ हजार,जिल्हास्तर : प्रथम ₹५ लाख, द्वितीय ₹३ लाख, तृतीय ₹१ लाख,राज्यस्तर : प्रथम ₹१० लाख, द्वितीय ₹७ लाख, तृतीय ₹५ लाख
  • या अभियानामुळे राज्यभर सशक्त, सुरक्षित आणि स्वावलंबी महिला सुरक्षित समाज घडविण्याचा महायुती सरकारने निर्धार केला आहे. त्यांचे स्वागत साऊ एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी व बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी केले आहे.
error: Content is protected !!