आष्टा – गुरुवार,दिनांक २२ मे २०२५ रोजी,तालुका भूम येथील विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या भावनिक आणि प्रेरणादायी प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आनंद हरिदास रामटेके,श्री.शशिकांत मांजरे तसेच सेवक श्री.बबन यादव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेच्या पूजनाने झाली.उपस्थितांनी मोहेकर अण्णांच्या शिक्षण क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण करत त्यांना आदरांजली अर्पण केली.त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे जीवन उजळले.आजही त्यांचे विचार व शिक्षणप्रणाली प्रेरणादायी ठरतात. या छोटेखानी पण अर्थपूर्ण कार्यक्रमात उपस्थितांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवून शिक्षणसेवा अधिक जोमाने करण्याचा संकल्प केला.
More Stories
भूम तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राहुल भट्टी यांची उपशिक्षणाधिकारीपदी पदोन्नती;विद्यामंदिर हायस्कूल आष्टाकडून गौरव व अभिनंदनाचा वर्षाव
ग्रामीण भागात ज्ञानदीप पेटवणाऱ्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कुल आष्टा येथे अभिवादन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन