कळंब – दिनांक २२ मे २०२५ रोजी, वार गुरुवारी कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला. महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्यास प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी,शिक्षकवृंद,व प्रशासकीय अधिकारी मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची आठवण करण्यात आली. गुरुजींनी आपल्या कार्यकाळात शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची दिशा दिली. त्यांच्या विचारांनी आणि कृतीने अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळून निघाले.आजही त्यांचे तत्त्वज्ञान व शिक्षणपद्धती महाविद्यालयाच्या दैनंदिन कार्यपद्धतीत प्रेरणास्रोत ठरत आहेत. या अभिवादन सोहळ्यामुळे सर्व उपस्थितांमध्ये प्रेरणादायी ऊर्जा संचारली.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले