कळंब – आशियाई स्क्वॉश क्रीडा स्पर्धेसाठी कळंब येथील वसुंधरा मुकुंद नांगरे हिची भारताच्या संघात निवड झाल्या बद्धल कळंब येथील दोस्ती ग्रुप च्या वतीने तिचा सत्कार करून, पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. चेन्नई येथे येथे 15 ते 19 मे दरम्यान झालेल्या आशियाई निवड स्पर्धेत वसुंधरा मुकुंद नांगरे हिने पंधरा वर्षे वयोगटात देशात तिसरा क्रमांक मिळवून आशियाई स्पर्धेतील आपले स्थान पक्के केले.जुलै महिन्यात दक्षिण कोरिया देशात होणाऱ्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेसाठी वसुंधराची भारताच्या संघात निवड झाली आहे.त्या बद्धल दोस्ती ग्रुप चे संजय घुले,भाई बाळासाहेब धस,सुनील हुलसुलकर,सतीश टोणगे,विठ्ठल जाधव यांनी तिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या वेळी तिचे वडील मुकुंद नांगरे उपस्थित होते.या वेळी वसुंधरा नांगरे हिने स्पर्धेची सर्व माहिती दिली.आपटेक च्या सभागृहात झालेल्या छाटेखानी कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय घुले तर आभार बाळासाहेब धस यांनी मानले.या वेळी विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.
*कळंबच्या शिवछत्रपती स्क्वॉश अकादमीत सातत्याने सराव अनेक स्पर्धेचा अनुभव,जिद्द,चिकाटी,मेहनत हीच वसुंधराला भारतीय संघात निवडीसाठी फायद्याची ठरली .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले