March 26, 2026

विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

आष्टा – भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये दि.८ मे २०२५ वार गुरुवार रोजी गुरुवार ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील सहशिक्षक शशिकांत मांजरे,सुजितकुमार जाधव,बबन यादव यांची उपस्थिती होती.
सर्वांनी मोहेकर गुरुजींच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली अर्पण केली.
शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी हे शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ होते. त्यांचे शिक्षणासाठीचे योगदान आजही शिक्षकवर्गाला मार्गदर्शक ठरत आहे.त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

error: Content is protected !!