February 9, 2026

शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब येथे इयत्ता पाचवी व आठवी मधील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
    प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्यंकट,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षिका कोळी जे.एन,आदींच्या हस्ते करण्यात आला.इयत्ता पाचवी मधून शिष्यवृत्ती पात्र ठरलेले विद्यार्थी संतोषी जनार्दन भामरे 252 गुण, संस्कृती दीपक सूर्यवंशी (232),शौर्य धनाजी सोमासे (222),आर्या अशोक टिप्परसे (210),शिवगण सिद्धी विठ्ठल (208), वटाणे आदित्य अशोक (200) जिंदमवार खुशी निशांत (190), शिंदे शिवप्रसाद गणेश ( 190) सावंत समर्थ संजय (188),जाधव स्वरूप श्रीकिशन ( 184 ),चंदनशिव अर्णव अमोल (180),शिंदे समर्थ सुनील (170),चौधरी विश्वजीत अण्णासाहेब (168), रितापुरे श्रेया बालाजी (160),
    अडसूळ श्रेया बालाजी (156), व्हडे गौरी अंकुश (154) दिवटे गौरी संतोश (148), देवकर प्रणव शाम (146),शिष्यवृत्ती परीक्षा 2025 यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी उदय हरीश काळे 280 गुण मिळवले आहेत.श्रेयश सुरेश गिलबिले (260), मृणाल संतोष पवळ (226), पार्थ प्रमोद तांबारे (220) ,गार्गी राजेश जाधव( 212), वरद मदन तांबारे (180), श्रावणी राहुल अडसूळ (176), रिया महेश आडणे (168), पियुष सुरेश ठोंबरे (162), पुष्कर हनुमंत चौधरी (154), सार्थक शहाजी राऊत (150), साक्षी किरण लोमटे (148), वैष्णवी अरविंद देवकर (138), आदी विद्यार्थिनी घवघवीत यश मिळवले आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रशालेत इयत्ता पाचवी व आठवीसाठी सीबीएसई वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, अध्यक्ष अनिलबापू मोहेकर, उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,संचालक डॉ.डी.एस जाधव आदींनी केले आहे. याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!