August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 13 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 111 कारवाया करुन 76,400 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)बळीराम गंगाराम इंगळे, वय,58 वर्षे, रा. आलुर, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.13.11.2023 रोजी 11.45 वा. सु. आलुर ते मुरुम जाणारे रोडचे उजवे बाजूस तुळजाभवानी चिकन शॉप मागे अंदाजे 2,000 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 20 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)यश्वंत गुडांप्पा कांबळे, वय 69 वर्षे, रा. बामणी, ता. जि. धाराशिव हे दि.13.11.2023 रोजी 11.40 वा. सु. बेंबळी मे बामणी जाणारे रोडचे दक्षिण बाजूला आरोपीचे घराचे पाठीमागे बाजूला अंदाजे 2,900 ₹ किंमतीची 29 लि. गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • आंबी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)तानाजी केरबा पवार, रा. पारेवाडी ता. परंडा जि. धाराशिव हे दि.13.11.2023 रोजी 18.00 वा. सु. स्वताचे घराच्या आडोशाला पारेवाडी येथे अंदाजे 980 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • भुम पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सेवक विष्णु पांढरे, वय 56 वर्षे, सुकटा, ता. भुम रा. जि. धाराशिव हे दि.13.11.2023 रोजी 17.45 वा. सु. भुम ते ईट जाणारे रोडवर डुक्करवाडी फाटा येथे पत्रयाचे शेड मागे अंदाजे 3,360 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 48 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)विलास चंद्रकांत कदम, वय 20 वर्षे, रा. माळेगाव, ता. केज, जि. बीड यांनी दि.13.11.2023 रोजी 12.50 वा. सु.आपल्या ताब्यातील महिंद्रा वाहन क्र एमएच 44 यु 1619 हा कळंब बस स्थानक समोर कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. तसेच 2)महादेव गंगाधर मोरे , वय 33 रा. भवानी नगर धारुर रोड केज ता. जि. बीड यांनी दि.13.11.2023 रोजी 11.30 वा. सु.आपल्या ताब्यातील महिंद्रा मॉडेल क्र एमएच 20 ई. जी. 3577 हा कळंब बस स्थानक समोर कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • बेंबळी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- राजाभाउ माधवराव कदम, वय 70 वर्षे, रा.कामेगाव ता.जि. धाराशिव यांचे मुख्य चैनल गेटचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 12.01.2023 रोजी 22.00 तेदि. 13.11.2023 रोजी 03.30 वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन घरातील पत्रयाच्या पेटीमधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण 3,55,792 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी- राजाभाउ कदम यांनी दि.13.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-गिता मनोज यादव, वय 35 वर्षे, रा. पवार अपार्टमेंन्ट प्लॉट नंबर 04 बालिंगा कोल्हापूर ता. करवीर जि. कोल्हापूर ह.मु. बाबा नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव या व त्यांचे आई इंद्राबाई वाघमारे या दि. 13.11.2023 रोजी 01.00 वा. सु. बाबानगर कळंब येथे घरात झोपले असताना अनोळखी तीन व्यक्तीने पत्रयाचे घराचा लोखंडी दरवाज्याची कडी कोंडा तोडून आत प्रवेश करुन 16 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 5,000₹ असा एकुण41,000₹किंमतीचा माल फिर्यादी व फिर्यादीच्या आईला मारहाण करुन जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- गिता यादव यांनी दि.13.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 394 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ खुन.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-नवनाथ अप्पाराव पाटील, रा. सराटी ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांनी दि. 13.11.2023 रोजी 07.45 वा. सु. शेत गट नं 105 मधील विहरीजवळ सराटी शिवारात मयत नामे- नरसाप्पा बाबुराव पाटील, वय 45 वर्षे, रा. सराटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना सामाईक विहिरीवर शेतीला पाणी देण्यासाठी मोटार टाकल्याचे कारणावरुन नमुद आरोपीने मयत नरसाप्पा पाटील यांचे डोक्यात पाठीमागे व समोरुन तोंडावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले.अशा मजकुराच्या फिर्यादी- रमेश पंडीत पाटील, वय 23 वर्षे, रा. सराटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.13.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 302 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)गणेश बबन मुंडे, 2)बबन मुंडे, 3) संतोष मुंडे, 4) धनंजय मुंडे,सर्व रा.गोविंदपूर, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.12.11.2023 रोजी 20.00 वा. सु. दत्तात्रय पेट्रोलियम गोविंदपूर ता. कळंब येथे फिर्यादी नामे- नानासाहेब कबन मुंढे, वय 32 वर्षे, रा. गोविंदपूर ता. कळंब जि. धाराशिव यांना स्वाईप मशीन मधून रक्कम काढण्यास सागिंतले असता नमुद आरोपीनी नकार देत फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, स्टीकने, लोखंडी पाईपने व फायबर खुर्ची मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- नानासाहेब मुंढे यांनी दि.13.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)नानासाहेब कबन मुंढे, रा. गोविंदपूर, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.12.11.2023 रोजी 20.00 वा. सु. गोविंदपूर येथील दत्तात्रय पेट्रोलियम पंप येथे फिर्यादी नामे- गणेश शिवाराज मुंढे, वय 23 वर्षे, रा. गोविंदपूर, ता. कळंब जि. धाराशिव यांना स्वाईप मशीन मधून रक्कम का काढून दिली नाही या कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश शिवाराज मुंढे यांनी दि.13.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!