August 9, 2025

सा.साक्षी पावनज्योतच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरांतून प्रकाशित होणाऱ्या सा.साक्षी पावनज्योतच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव मा.डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांच्या हस्ते शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या कॅंम्पसमध्ये संपन्न झाले.
    याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संघटक प्रा.दिलीप पाटील,ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प महादेव आडसूळ महाराज,सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत,विशेष प्रतिनिधी राजेंद्र बारगुले,शहर प्रतिनिधी महेश फाटक,महाविष्णू आडसूळ,हनुमंत ढगे व कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!