August 9, 2025

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

  • लातूर –महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील जयंती उत्सव समिती आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, डॉ. बाळासाहेब गोडबोले, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार सोनी, डॉ. एस.आर.पंचाक्षरी, यशपाल ढोरमारे, रत्नेश्वर स्वामी, विनायक लोमटे, अनिल उस्तुर्गे, राम पाटील, योगिराज माकणे, अनिल कोळळे, राजाभाऊ बोडके, ए. एम. गायकवाड यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे म्हणाले की, भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बाल दिन म्हणून साजरी केली जाते. कारण त्यांना बालकांविषयी अतूट प्रेम होते. त्यांचे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान होते आज आपण त्यांच्या कार्याची माहिती घेऊन त्याप्रमाणे कृती करण्याची प्रतिज्ञा घेतल्यास हीच खरी त्यांना भावपूर्ण आदरांजली असेल असेही ते म्हणाले.
error: Content is protected !!