April 29, 2025

Home »ई-पेपर पुष्पराज खोत यांचा भव्य सत्कार

पुष्पराज खोत यांचा भव्य सत्कार

  • कळंब- नुकत्याच जाहीर झालेल्या देशातील अतिशय प्रतिष्ठित,अवघड यूपीएससी UPSC परीक्षेच्या 2024 च्या निकालांमधून धाराशिव जिल्ह्याची शान सटवाई वाडी ता. वाशी जि.धाराशिव या गावचे सुपुत्र पुष्पराज नानासाहेब खोत यांनी 304 Rank प्राप्त करून उत्तुंग यश मिळवलं याबद्दल बिक्कड सर मित्र परिवाराच्या वतीने शासकीय विश्रामगृह कळंब या ठिकाणी ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ व प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.रमेश जाधवर,स्व.गणपतराव कथले युवक आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब कथले,पत्रकार बालाजी आडसूळ, साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी परमेश्वर पालकर,मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
    याप्रसंगी उपस्थित पत्रकार बालाजी अडसूळ,परमेश्वर पालकर,मंगेश यादव,रमेश अंबिरकर या बांधवांनी विविध प्रश्न विचारून पुष्पराज खोत यांची यशोगाथा सर्वांच्या समोर आणली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक महादेव खराटे व कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी केले.याप्रसंगी प्रा.घोळवे, राजेंद्र पवार,बबन पाळवदे,हरिभाऊ मोरे,अमोल पवार,बन्सी मोराळे व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
error: Content is protected !!