(जिमाका)- जिल्ह्यातील युवा व नोंदणीकृत संस्थांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा पुरस्कार २०२३ -२४ आणि २०२४ -२५ यांची घोषणा करण्यात आली आहे.या पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र,सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम (युवक/युवतीसाठी १० हजार रुपये,संस्थेसाठी ५० हजार रुपये) असे आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा युवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली २४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पुरस्कारार्थींची निवड अंतिम करण्यात आली.बैठकीस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सन २०२३ -२४ चे पुरस्कारार्थी हे पुढीलप्रमाणे आहेत.युवक – गणेश विक्रम मुळे,रा.मुळेवाडी,धाराशिव,युवती – डॉ.गौरी विजय बागल,तांबरी विभाग,धाराशिव.संस्था – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था,सारोळा (बु.), धाराशिव. सन २०२४ -२५ चे पुरस्कारार्थी : युवक :विकास शंकर लोभे,रा.कानेगाव, ता.लोहारा,धाराशिव युवती : श्रीमती अस्मिता रमेश शिंदे,मु.पो.शिंगोली, धाराशिव.संस्था : श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्था,गोजवाडा,ता.वाशी, धाराशिव हे आहेत. या पुरस्कारांचे वितरण १ मे २०२५ रोजी,महाराष्ट्र दिनानिमित्त,जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी व सचिव,जिल्हा युवा पुरस्कार समिती श्रीकांत हरनाळे यांनी दिली.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
सुरेश टेकाळे,सुनील पुजारी,डॉ.गिरीष कुलकर्णी यांचा विशेष सत्कार
धाराशिव जिल्हा पोलिसनामा