April 29, 2025

Home »ई-पेपर ज्ञान प्रसारक मंडळात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन

ज्ञान प्रसारक मंडळात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना अभिवादन

कळंब – येथील ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे व ‘शिक्षण महर्षी’ म्हणून ओळखले जाणारे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचा दि.२४ एप्रिल २०२५ वार गुरुवार रोजी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
गेल्या चार दशके शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या मोहेकर गुरुजी यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले असून,ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे.

ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा ता.कळंब येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरूजींना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील,नवनाथ करंजकर,देवदत्त मोहेकर,संजय आडणे,शैलेश गुरव,कमलाकर शेवाळे,दिगांबर शिंदे आदी जण उपस्थित होते.


ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने व विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्हि.जी,प्रशालेचे उपमुख्याध्यापक मायाचारी व्ही एस,माळवदकर महेश,पवार डी . बी,पवार विशाल,काळे बंडू, आप्पासाहेब वाघमोडे तसेच सलके देविदास,महेश कदम,काळे अरुण या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.

ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे ,श्रीमती पांचाळ उषा,श्रीमती सोनवणे नीता,जाधव पांडुरंग आदींची उपस्थिती होती.

भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींनी अभिवादन केले.

error: Content is protected !!