धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 250 कारवाया करुन 1,93,000 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-श्रीराम अरुण जाधव, वय 39 वर्षे, रा. बावची ता. परंडा जि. धाराशिव हे दि.30.03.2025 रोजी 10.40 वा. सु. बावची फाट्यावर जवळ ढगपिंप्री रोड अंदाजे 6,125₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 93 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी नामे-पोपट बापू काळे, वय 40 वर्षे, रा. दुधी ता.परंडा जि. धाराशिव हे दि.30.03.2025 रोजी 06.45 वा. सु. उल्फा नदीलगत दुधी येथे अंदाजे 92,500 ₹ किंमतीचे 1,850 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये परंडा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-अशोक अंबादास बेद्रे, वय 60 वर्षे, रा.माकणी ता.लोहारा जि. धाराशिव हे दि.30.03.2025 रोजी 10.30 वा. सु. माकणी येथे अंदाजे 1,200 ₹ किंमतीच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-जलुसाबाई देवराव काळे, वय 67 वर्षे, रा.सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव या दि.30.03.2025 रोजी 08.15 वा. सु.आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 13,150 ₹ किंमतीचे 200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-राहुल रामराव पवार, वय 40 वर्षे, रा.वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.30.03.2025 रोजी 12.00 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रं एमएच 25 एक्यु 1010 ही भारत पेट्रोलपंपा समोर वाशी येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला.
“ गोवंशीय मांस वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-रोह रियाज कुरेशी, वय 19 वर्षे, रा. सुभाष नगर कोरेगाव सातारा ह.मु. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव,शाहरुख मोहम्मद कुरेशी, 24 वर्षे, रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.30.03.2025 रोजी 05.00 वा.सु.माणकेश्वर येथे कुरेशी गल्ली येथे रस्त्यावर ग्रामपंचायतचे जागेत गोवंशीय जनावराचे कापून त्याची कातडी सोलत असताना गोमांस, सत्तुर व चाकु सह एकुण 1,05,000 ₹ किंमतीचे गोवंशाची बेकायदेशीरपणे कत्तल करुन संशयित गोमांस ताब्यात बाळगताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5 (क), 9, 9 (अ) प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
बेंबळी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-कृष्णा विष्णु माळी, वय 30 वर्षे, रा. गौडवगाव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची टी व्ही एस स्टार सिटी मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 0973 ही दि. 26.03.2025 रोजी 24.00 ते दि. 27.03.2025 रोजी 06.00 वा. सु. कृष्णा माळी यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कृष्णा माळी यांनी दि.30.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-उत्रेश्वर यशवंत माने, वय 68 वर्षे, रा. देवधानोरा ता.कळंब जि. धाराशिव ह.मु. हानुमान मंदीर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे नागुलगाव शिवारातील शेत गट नं 134 मधून 500 फुट केबल अंदाजे 15000₹ किंमतीची दि. 29.03.2025 रोजी 23.00 ते दि. 30.03.2025 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-उत्रेश्वर माने यांनी दि.30.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-ऋषीकेश तानाजी मुंडे, वय 23 रा. पवारवाडी ता.जि. धाराशिव यांनी दि.26.03.2025 रोजी 18.00 ते 18.30 वा. सु. पानटपरी समोर पवारवाडी येथे फिर्यादी नामे-पांडुरंग विठ्ठल पांढरे, वय 45 वर्षे, रा. पवारवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने विनाकारण शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, रॉड व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. टपरीवर दगड मारुन नुकसान केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पांडुरंग पांढरे यांनी दि.30.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2),115(2),324 (4)(5),352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आज दि.31.03.2025 रोजी रमजान ईद (ईद उल फितर) निम्मीत धाराशिव जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदान मस्जीद येथे हजारो मुस्लीम बांधवांनी शांतेत नमाज पठाण केले. मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव हे धाराशिव ईदगाह मैदान येथे उपस्थित राहुन मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देवून ईद निमीत्त शुभेच्छा दिल्या. सदर वेळी आ. राणा जगजीतसिंह पाटील, मा.जिल्हाधिकारी श्री. किर्ती पुजार, जि.प.कार्यकारी अधिकारी मंयक घोष व इतर मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ईदगाह मैदान व मस्जीद येथे योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. (सोबत छायाचित्रे जोडली आहेत.)
जनसंपर्क विभाग, धाराशिव पोलीस “सेवानिवृत्त 8- अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ मा. पोलीस अधीक्षक यांचे हस्ते संपन्न.”
पोलीस अधीक्षक कार्यालय : होणाऱ्या पोलीस अधिकारी- अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. धाराशिव पोलीस दलातील पोलीस उप निरीक्षक- रब्बानी अब्दुल आरेफ जुनेदी, श्रेणी पोलीस उप निरीक्षक- श्री. शंकर जगदाळे, महेबुब खान पठाण, सहाय्यक पोलीस फौजदार-संदीपान साबळे, राजासाहेब फुलारी, पोलीस हावलदार-तुकाराम खामकर, सोनटक्के, पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रमुख लिपीक- राजाराम पवार या 8 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ आज दि. 31.03.2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय सभागृहात मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. निरोप समारंभादरम्यान मा. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सपोनि श्री.संतोष तिघोटे यांनी केले. तर कार्यक्रंमाचे आभार प्रदर्शन पोनि श्री. गणेश कानगुडे यांनी केले. सदर वेळी पोनि विनोद इज्जपवार, पोनि चिंतले उपस्थित होते. (सोबत निरोप समारंभाची छायाचित्रे जोडली आहेत.)
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला