August 8, 2025

शास्त्रीय गायक अभिषेक काळे यांच्या गायनास रसिक श्रोत्यांची दाद

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागतासाठी कलोपासक मंडळांच्या वतीने गुरुवर्य डी.के. कुलकर्णी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिनांक 30 मार्च रविवार रोजी विठ्ठल मंदिर कळंब येथे चैत्र पालवी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक अभिषेक काळे यांनी आपल्या बहारदार आवाजात शास्त्रीय गायनाने सुरुवात केली. यानंतर भजन ,नाट्यगीत व भैरवी सादर करून श्रोत्यांची भरभरून दाद मिळवली.यामध्ये संत चोखोबा यांचा अभंग आम्हां न कळे ज्ञान ! न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा !!चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा नाम तुझे !!! तसेच ……अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर …….. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग याचबरोबर त्यांनी इतना तू कर स्वामी जब प्राण तणसे निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले….. तसेच पाखरा हे गीत रसिक,श्रोत्यांच्या मागणीवरून गायन केले, व रसिका श्रोत्यांची भरभरून दाद मिळवली
    गायनासाठी साथ संगत –
    तबला संजय सुवर्णकार, संवादिनी प्रा.शशिकांत देशमुख,
    पखवाज हनुमंत कसालबादे यांनी दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती देवी व शैक्षणिक व सामाजिक चळवळीतील कै.डि. के. कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन एस.आर ,पाटील, महादेव महाराज अडसूळ, ऍड.
    एस.एम. कुलकर्णी, बब्रुवान पांचाळ,सुरेश कल्याणकर, विजय मोहिते,गोविंद कुलकर्णी,यांनी केले तर गायक अभिषेक काळे व साथ संगत करणाऱ्या कलाकारांचे स्वागत श्रीकांत कळंबकर, अनिल कुलकर्णी, विलास खांडेकर यांनी केले याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक यशवंत दशरथ यांनी कळंब शहरात कलोपासक मंडळाच्या वतीने नवीन गायकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रतिवर्षी राज्यातील राज्याबाहेरील नामवंत गायकांना गुढीपाडवा व दिपवाली पाडवा संगीत महोत्सव कार्यक्रमात निमंत्रित केले जात असल्याची माहिती दिली तर गायक अभिषेक काळे यांनी लातूर या जिल्ह्यात शास्त्रीय संगीताचे जाणकार श्रोते असल्याने त्यांच्यापुढे गायनाची ही संधी संयोजकांनी मिळून दिली आहे असे सांगितले गायनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.गिरीष कुलकर्णी, यांनी तर आभार शशिकांत देशमुख यांनी मानले कार्यक्रमासाठी फ्रेंड्स फोरेव्हर ग्रुप , रोटरी क्लब कळंब सिटी सदस्य , तसेच रसिका श्रोत्यांची मोठीउपस्थिती होती यांचीकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलोपासक मंडळाचे अनिल कुलकर्णी, अनिता कुलकर्णी,डॉ.अमित पाटील , पंडित दशरथ, दर्शन पोरे, विलास खांडेकर,वेदांत कुलकर्णी,सदस्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!