June 20, 2025

आंतरराष्ट्रीय कचरा कामगार दिवसा निमित्त मेळावा

  • संभाजी नगर – आंतरराष्ट्रीय कचरा कामगार दिवसा निमित्त दि.१ मार्च २०२५ रोजी इंदिरानगर मध्ये कचरा कामगारांचा मेळावा संपन्न झाले.असे कागद कांच पत्रा कामगार संघटनेच्या साथी आशाबाई डोके यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
    अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांनी, दि.१ मार्च १९९२ रोजी,कचरा वेचकावर गोळीबार केल्याने त्यात ११ कचरा वेचक ठार झाले,त्या दिवसाची आठवण म्हणून १ मार्च हा दिवस जगभर, आंतरराष्ट्रीय कचरा कामगार दिवस म्हणून पाळला जातो.
    शहरातील गारखेडा भागातील इंदिरानगर वस्ती मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कचरा कामगारांचा मेळावा घेण्यात आला.
    मेळाव्यास कागद कांच पत्रा कामगार संघटनेचे अध्यक्ष साथी सुभाष लोमटे व बाजार समितीचे संचालक साथी देविदास किर्तीशाही यांची प्रमुख उपस्थिती होती.
    वर्षानुवर्षांपासून कचरा कामगार म्हणून काम करणाऱ्या कचरा वाचकांना महानगरपालिकेने त्यांच्या घन कचरा व्यवस्थापनात सामावून घ्यावे,सर्व कचरा वाचकांना ओळखपत्र द्यावीत, अंत्योदयची रेशन कार्डस, पाल्यांना शिष्यवृत्ती,मोफत आरोग्य सुविधा व राहण्यासाठी हक्काचे घर,इ.मागण्यांची सरकारने पूर्तता करावी नसता, रस्त्यावर येवून संघर्ष केला जाईल असा इशारा या मेळाव्यात देण्यात आला.
    कार्यक्रमाचे सुरुवातीस महात्मा फुले यांचा अखंड आणि आभाळाची आम्ही लेकरे,हे गीत सामुदायिक पणे सादर केले गेले.
error: Content is protected !!