शासनाकडून वेळापत्रक जाहीर-राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या मागणीला यश
कळंब – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतर जिल्हा बदलीची सुरुवात सन 2017 सालापासून झाली. तेव्हापासून आतापर्यंत आंतरजिल्हा बदलीचे एकूण सहा टप्पे पूर्ण झाले आहेत. शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली प्रक्रियेमधील होणारा भ्रष्टाचार व वर्षानुवर्षी लालफितीत अडकणारी प्रक्रिया ऑनलाइन बदली धोरणामुळे थांबली. दरवर्षी माहे एप्रिल /मे महिन्यामध्ये बदली इच्छुक शिक्षकांना आपल्या स्वजिल्ह्यात बदलीने जाण्याचे वेध लागतात.वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत पती-पत्नी यांच्या कौटुंबिक जीवनात स्थैर्य आणण्याचे काम या आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून होते. विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना बदलीपात्र म्हणून समजले जाते.बदलीच्या माध्यमातून विधवा,कुमारिका, घटस्फोटीत- महिला शिक्षिकांना स्व-जिल्ह्यात जाता येते. वर्षानुवर्षे इतर जिल्ह्यातील सेवा केल्यानंतर स्वजिल्ह्यात बदली हा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. परंतु आंतरजिल्हा बदलीच्या सातव्या टप्प्यात मध्यंतरीची लोकसभा व विधानसभा निवडणूक व त्या अनुषंगाने आलेली आचारसंहिता यामुळे खंड पडला होता.यामुळे आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षकांमध्ये थोडीशी धाकधूक पाहायला मिळाली परंतु राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाने याबाबत ग्राम विकास विभागाच्या मंत्री महोदयांची यांची भेट घेऊन त्यांचे ओएसडी नारायण गोरे यांना याबाबतची निवड लक्षात आणून दिली. याचबरोबर महाराष्ट्रातील विविध आमदाराचे पत्रही ग्रामविकास विभागाला प्राप्त झाले.याची दखल घेऊन सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिनांक १० मार्च ते 6 एप्रिल 2025 पर्यंत आंतरजिल्हा बदलीच्या करावयाच्या कार्यवाहीचे वेळापत्रक शासनाकडून देण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून बदली इच्छुक शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
## *करावयाची कार्यवाही व त्यासाठी कालावधी*–
1) शिक्षकाची माहिती पोर्टलवर अद्यावत करणे — 10 मार्च 2025 पर्यत.
2)जि.प.ने बिंदू नामावल्या तपासून घेणे व पोर्टलवर रिक्त पदांची माहिती अपलोड करणे –11 मार्च ते 13 मार्च 2025 पर्यत.
3) शिक्षकांना अर्ज भरण्याची सुविधा– 14 मार्च ते 20 मार्च 2025 पर्यत.
4) अर्जाची पडताळणी– 21 मार्च ते 25 मार्च 2025 पर्यंत.
5) न्यायालयीन प्रकरणे विभागीय आयुक्त अपील प्रकरणी तपासणी– 26 मार्च ते 27 मार्च 2025 पर्यंत.
6) आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण करणे –28 मार्च ते 6 एप्रिल 2025 पर्यंत.
** सर्व बदली इच्छुक शिक्षकांच्या बदल्या होण्यासाठी जिल्हावार रिक्त पदांची माहिती प्रत्येक जिल्हा परिषदेने अचूक कळविणे आवश्यक आहे.त्याचबरोबर जिल्हानिहाय रोष्टर अपूर्ण असल्याने काही जिल्ह्यातील बदली प्रक्रिया पूर्ण होत नाही त्यासाठी राज्यरोष्टर हा एकमेव पर्याय संघटनेसमोर आहे.भविष्यात त्यासाठी मोठा लढा उभारावा लागणार आहे. त्याचबरोबर काही जिल्हा परिषदा बदली होऊनही सदर शिक्षकांना कार्यमुक्त करत नाहीत त्याबाबत ही ठोस धोरण शासनाने अवलंबिन्याची गरज आहे. — संतोष भोजणे राज्य सरचिटणीस राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे