धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 268 कारवाया करुन 2,30,500 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे. “ अवैध मद्य विरोधी कारवाई.” मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल बुधवार दि.26.02.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 11 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले सुमारे 175 लिटर गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 43 सिलबंद बाटल्याअसे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 27,755 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत. 1)शिराढोण पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अरुण बारीक काळे, रा.शिराढोण पारधीपिढी ता. कळंब जि. धाराशिव हे 12.50 वा. सु. दाभापाटी जवळ कळंब ते लातुर जाणारे रोडलगत पत्र्याचे शेडचे बाजूस अंदाजे 1,775 किंमतीची 15 लिटर गावठी देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-शालुबाई दत्ता काळे, वय 40 वर्षे, रा. शिराढोण पारधी पिढी ह.मु. एकुरगा शिवार या 12.20 वा. सु. शिराढोण जाणारे रस्त्या लगत बालाजी ट्रस्ट शिराढोण गोरक्षण गायरान चे मोकळे जागेत अंदाजे 900 किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)ढोकी पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-लता वसंत शिंदे, वय 41 वर्षे, रा. वाखरवाडी ता. जि. धाराशिव या 12.20 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 5,600 किंमतीची 70 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 3)मुरुम पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-सोमन्ना हनमंत सगर, वय 50 वर्षे,रा.हीलालपुर ता. हल्लीखेडा ह.मु. कडदोरा ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. कडदोरा येथे कडदोरा ते व्हणताळा रोडलगत अंदाजे 3,000किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-किशन, काशीराम मदने, वय 73 वर्षे,रा.बोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.15 वा. सु. दाळींब येथे रामा नारायण याचे घराचे पाठीमागे अंदाजे 2,000किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 4)लोहारा पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अमोल श्रीकांत बिराजदार, वय 26 वर्षे,रा.जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव हे 18.35 वा. सु. गावातील चरण कमल हॉटेल मध्ये अंदाजे 8,590किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.तर आरोपी नामे-राम सुनिल सुरवसे, वय 21 वर्षे,रा.सय्यद हिप्परगा लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. जेवळी ते सय्यद हिप्परगा जाणारे रोडलगत अंदाजे 1,830किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 5)भुम पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-आशिष शहाजी भोरे, वय 26 वर्षे,रा.जांब ता. भुम जि. धाराशिव हे 18.10 वा. सु. बावी फाटा येथे रोडलगत असलेल्या हॉटेल साईसागर समोर अंदाजे 1,120किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. 6)आनंदनगर पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-जयाबाई नारायण वाघमारे, वय 45 वर्षे,रा.शिंगोली ता.जि.धाराशिव हे 18.85 वा. सु.शिंगोली येथील कडगिरी नाकाचे पाठीमागे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,000 किंमतीची 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 7)तामलवाडी पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अजय सुखदेव शिंदे, वय 29 वर्षे,रा.पिंपळा खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 18.45 वा. सु. सुरतगाव ते पिंपळा खुर्द जाणारे रोडलगत असलेल्या पत्र्याचे शेडचे बाजूस अंदाजे 1,040किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 4 सिलबंद बाटल्या व 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.तर आरोपी नामे-संतोष शंकर चौगुले, वय 43 वर्षे,रा. पिंपळा खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.25 वा. सु. सुरतगाव ते पिंपळा खुर्द जाणारे रोउलगत असलेल्या पत्र्याचे शेडचे बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 900किंमतीची 5 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. “ जुगार विरोधी कारवाई.” ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.26.02.2025 रोजी 15.10ते 17.25 वा. सु. ढोकी पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-तौफिक रसुल पटेल, वय 23 वर्षे, रा. येडशी ह.मु. तेर ता. जि. धाराशिव हे 15.10 वा.सु तेर येथे बसस्थानक समोर मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1010 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-काका मारुती देवकते, वय 41 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव, महादेव बळीराम थोरात, वय 40 रा तेर ता.जि.धाराशिव हे 17.25 वा.सु तेर ते तेरणा नदीच्या काठावर मोकळ्या जागेत पत्राचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 10,310 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत. धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.26.02.2025 रोजी 19.40 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीतधारासुर मर्दीनी कमानी जवळ हॉटेल स्वराज चहा सेंटर चे समोर मोकळे जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-जगदीश जालींदर जाधव, वय 34 वर्षे, रा.इंगळे गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.40 वा.सु धारासुर मर्दीनी कमानी जवळ हॉटेल स्वराज चहा सेंटर चे समोर मोकळे जागेत मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 1,020 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.26.02.2025 रोजी 15.45 वा. सु. भुम पो ठाणे हद्दीत लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राजेंद्र मंगेश सुरेश लाडेकर, वय 25 वर्षे, रा. लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे 15.45 वा.सु लक्ष्मीनगर भुम ता. भुम जि. धाराशिव कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 400 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.26.02.2025 रोजी 17.31 वा. सु. येरमाळा पो ठाणे हद्दीत तेरखेडा गावातील हनुमान मंदीरासमोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-शशिकांत पांडुरंग पवार, वय 43 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे 17.31वा.सु तेरखेडा गावातील हनुमान मंदीरासमोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,050 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.” परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-महंम्मद तात्या शिंदे, वय 39 वर्षे, रा. वैद गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव,पिंटु लाला जाट, वय 30 वर्षे, रा.आगरकर गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.26.02.2025 रोजी 09.30 ते 15.10 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे गाडी नं क्र एमएच 48 जी 1826, वाहन क्र एमएच 14 एच. जी. 0252 ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर परंडा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत. येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-भाउसाहेब अनिल पवार, वय 23 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.26.02.2025 रोजी 16.15 वा. सु. आपल्या ताब्यातील गाडी ही येरमाळा बसस्थानक समोरील गेट समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना येरमाळा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.” धाराशिव शहर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-विशाल लक्ष्मण शिंदे, वय 37 वर्षे, रा. शिंदेवाडी ता. जि. धाराशिव यांचे ॲमरॉन कंपनीच्या 12 व्होलटच्या 12 बॅटरी व टिप्परमधील अंदाजे 100 लिटर डिझेल असा एकुण 36,200₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने दि.24.02.2025 रोजी 06.30 वा. सु. ते दि. 25.02.2025 रोजी 09.00 वा. सु. अग्नीशामक ऑफिसच्या बाजूस धाराशिव येथुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विशाल शिंदे यांनी दि.26.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- तुकाराम यशवंत पाटील,वय 44 वर्षे, रा. येडे निपाणी ता. वाळवा जि. सांगली ह.मु. तपोवन नगर वाशी ता. वाशी जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटरसायकल काळ्या रंगाची नंबर एमएच 14 एलके 1510 ही दि. 14.02.2025 रोजी रात्री 10.00 ते दि. 15.02.2025 रोजी 08.30 वा. सु. भाड्याने राहत असलेल्या शंकर सैनी यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तुकाराम पाटील यांनी दि.26.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. “शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल.” तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-गणेश प्रभाकर पाटील व सोबत 12 महिला व पुरुष यांनी दि. 25.02.2025 रोजी 11.15 वा. सु. तहसील कार्यालय तुळजापूर जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-अरविंद शंकरराव बोळगे, वय 43 वर्षे, व्यवसाय- शासकिय नोकरी सध्या तहसीलदार तहसील कार्यालय तुळजापूर ह.मु. तुळजापूर मुळ रा. भातांगळी ता. जि. लातुर हे त्यांचे कार्यालयात शासकिय काम पार पाडत असताना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सोबत प्लॅस्टीक बाटली मध्ये ज्वलनशील द्रव्य स्वरुपाचा पदार्थ, आगपेटी घेवून बेकायदेशीरपणे फिर्यादीचे दालनात प्रवेश करुन स्वत:स आगपेटीचे साह्याने पेटवुन घेण्याचा प्रयत्न करुन दुसऱ्याचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन शायकीय अधिकारी यांचेवरती दबाव निर्माण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मा. जिल्हाधिकारी धाराशिव यांचे बंदीआदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अरविंद बोळगे यांनी दि.26.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2),190, 125, 221, 312 सह कलम 37(1),(3) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे. “मारहाण.” नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- मुजमील शब्बीर कुरेशी, गौस कुरेशी सलमान राजु कुरेशी व इतर 6 इसम सर्व रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 26.02.2025 रोजी 15.20 वा. सु. बसस्थानक नळदुर्ग येथे फिर्यादी नामे-गणेश शिवराज मुळे,वय 20 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मित्र शिवराज निवृत्ती बोंगरगे रा. अणदुर यांना नमुद आरोपींनी मागील झालेल्या गोतस्करीच्या कारवाईचा राग मनात धरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गणेश मुळे यांनी दि.26.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 115(2),352,351(3), 189(2),190,191(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. “अपहरण.” उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- प्रेमनाथ उर्फ बब्रुवान फुकटे रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 21.10.2024 रोजी 20.00 वा. सु. पुर्व माडज येथे फिर्यादी नामे- सरोजा महेश उर्फ माउली गायकवाड, वय 40 वर्षे, रा. पुर्व माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांचे पती नामे- महेश उर्फ माउली बाबुराव गायकवाड, वय 49 वर्षे, रा. पुर्व माडज ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने आपल्याला ट्रक घेवून नाशिकला जायचे आहे तु सोबत चल असे म्हणून फिर्यादीचे पतीस बळजबरीने घेवून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सरोजा गायकवाड यांनी दि.26.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 140(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. “रस्ता अपघात.” शिराढोण पोलीस ठाणे: मयत नामे- अनिकेत माधव उमाप, वय 23 वर्षे, रा. पळसखेडा ता. केज जि. बीड हे दि.12.02.2025 रोजी 07.30 वा. सु. कळंब ते लातुर जाणारे रोडवर रांजणी गावाजवळ मोटरसायकल क्र एमएच 44 एच 9245 वारुन जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र आर जे 21 आर. उच 9466 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून कुठलेही इंडीकेटर न देता अचानकपणे समोर आल्याने अनिकेत उमाप यांची मोटरसायकल ही ट्रॅक्टर पाठीमागुन धडक झाल्याने अनिकेत उमाप हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद ट्रॅक्टर चालक का जखमीस उपचार कामी घेवून न जाता निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोविंद दगडु पौळ, वय 38 वर्षे, रा. कौडगाव ता. केज जि. बीड यांनी दि.26.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(बी), 106 सह कलम 134 (अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे. लोहारा पोलीस ठाणे: मयत नामे- सुरेश धामणकर, रा. सलगरा दिवटी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.21.02.2025 रोजी 09.30 वा. सु. लोहारा सलगरा जाणारे शिवकर वाडी पाटील जवळून लुनावरुन जात होते. दरम्यान फोरव्हिलर वाहन नंबर एमएच 25 ए.एस. 9795 चा चालकाने त्याचे ताब्यातील वाहन ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून सुरेश धामणकर यांचे लुनाला धडक दिली. या अपघातात सुरेश धामणकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद वाहन चालक का जखमीस उपचार कामी घेवून न जाता निघून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शांताप्पा सुरेश धामणकर, वय 30 वर्षे, रा. सलगरा दिवटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.26.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106 (1)सह कलम 134 (अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे. धाराशिव पोलीस
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला