June 21, 2025

मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये “मराठी भाषा गौरव दिन” साजरा

  • कळंब – शहरातील मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये मराठी भाषा दिन विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.यावेळी कवी कुसुमाग्रजांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उद्योजक विठ्ठल माने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बालकवी अश्रुबा कोठावळे,कवी सोपान पवार, प्राचार्या लता यंदे उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मॉडेल इंग्लिश स्कूलचे पोपट लोमटे यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले.
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक शुभांगी पालकर यांनी केले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेले मराठी भाषेतील विविध प्रयोग,वेगवेगळे बॅनर,फलक प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.त्याच पद्धतीने मराठी भाषेमध्ये विद्यार्थ्यांनी पैकी यज्वान पाटील,चैत्राली गायकवाड ,स्वराली पाटील या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे मराठी भाषेत भाषणे केली.
    यावेळी अध्यक्ष विठ्ठल माने यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, मराठी भाषा किती प्रगल्भ आहे ,मराठी भाषेचे महत्त्व सांगितले ,शाळेचे देखील कौतुक केलं,आणि विद्यार्थ्यांनी मराठीतून बोललं पाहिजे , मराठी भाषेची अविट अशी गोडि आहे हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितलं त्यासोबतच आश्रुबा कोठावळे यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना ‘जोंधळ’ ही कविता सादर केली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग घेत विद्यार्थ्यांना स्वतःच्या कवितेमध्ये सामावून घेत एकापेक्षा एक सरस अशा सुंदर कविता त्यांनी सादर केल्या. त्यासोबतच विद्या भवन माध्यमिक शाळेचे सोपान पवार यांनी आपल्या भाषना मध्ये मराठी भाषेचे महत्त्व सांगितले , मराठी भाषा किती महान आहे हे सांगितले मराठी भाषेची थोरवी सांगितली.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मराठी भाषा गौरव दिन या निमित्त घेण्यात आलेल्या श्रुतलेखन स्पर्धेत प्रथम,द्वितीय आलेल्या अशा विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार बाळासाहेब मुळे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी मेहनत घेतली.
error: Content is protected !!