आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखालील विद्या मंदिर हायस्कूल आष्टा ता.भूम येथे दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून त्यांच्या अमूल्य साहित्यसंपदेची आठवण जागवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली.प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आणि मराठी साहित्यविश्वातील योगदानावर भाष्य केले. “फकिरा”,”माझी मैना गावावर राहिली” यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी मराठी जनमानसावर खोल छाप पाडली,याचा उल्लेख या वेळी करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मराठी भाषेचे महत्त्व,तिच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना,तसेच तरुण पिढीला मातृभाषेची ओढ निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. मराठी भाषेचा अभिमान बाळगूया,तिच्या संवर्धनासाठी एकजूट होऊया!असा संदेश यावेळी देण्यात आला. या प्रसंगी मुख्याध्यापक आनंद रामटेके,याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूलमध्ये नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांना अभिवादन