August 9, 2025

इटकुर मध्ये भरला बाल गोपाळा सह पालकांचा मेळावा

  • इटकुर (अमोल रणदिवे) – कळंब तालुक्यातील इटकुर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ वार शनिवार रोजी अंगणवाडी पर्यविक्षिका संगीता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.यात एक ते तीन वयोगटातील बालकांच्या पालकांना बालकाचे आरोग्य,बौद्धिक,शारीरिक विकास,सामाजिक वातावरण या सर्वांगीन विकासाबाबत पालकांनी लहान मुलांचे संगोपण कसे करावे या वर मार्गदर्शन आपल्या कृतीतुन पर्यविक्षिका संगीता सावंत यांनी केले.
    विठ्ठल रुक्माई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षांनी जि.प.प्रशाला केंद्रीय शाळेच्या मुख्याधिपिका शारदा मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी पर्यवेक्षिका आगलावे,तुकाराम शिंदे,भारत गुढे,पोलीस पाटील सोमनाथ जगताप उपस्थित होते. यावेळी पोषण आहार,शरीर वर्धक ऊर्जावर्धक,संरक्षणात्मक भविष्याचे झाड,वैज्ञानिक दृष्टिकोन,बालकांच्या भविष्याचे झाड अशी अनेक सादरीकरणाचे स्टॉल अंगणवाडी सेविका यांनी थाटली होती.निरीक्षणातून बदल या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार गायत्री क्षीरसागर यांनी व्यक्त केले.यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका,मदतीस यांचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!