May 9, 2025

Home »ई-पेपर नैतिक मुल्यांचे प्रतिबिंब म्हणजेच छत्रपती शिवराय – आदेश शिंदे

नैतिक मुल्यांचे प्रतिबिंब म्हणजेच छत्रपती शिवराय – आदेश शिंदे

  • कळंब – छत्रपती शिवराय हे फक्त विर योद्धाच नव्हते तर ते माणसाला माणूसपण कसे जपावे आणि यासाठी लागणारी नैतिक मुल्यांचा साठा असणारे व्यक्तिमत्त्व होते.त्यामुळे नैतिक मुल्यांचे प्रतिबिंब हे छत्रपती शिवराय यांच्यात दिसुन येते.असे प्रतिपादन युवा व्याख्याते आदेश शिंदे यांनी केले.
    ते कळंब येथील डिकसळ मध्ये असणाऱ्या स्वप्ननगरी शिवजन्मोत्सव सोहळ्यातील व्याख्यानमालेत बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संतोष राऊत, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल यादव,कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, अध्यक्ष अशोक शिंदे,व्हाईस ऑफ मिडियाचे राज्य कार्यवाह अमर चोंदे,कळंब तालुका पत्रकार मंडळाचे अध्यक्ष धनंजय घोगरे,व्हाईस ऑफ मिडियाचे तालुकाध्यक्ष रणजित गवळी, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष परमेश्वर पालकर,सचिव अड. तानाजी चौधरी,ॲड.विशाल कवडे,सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब धाकतोडे,स्वप्ननगरी सोसायटीचे अध्यक्ष दिलीप टोणगे,उपाध्यक्ष अनिल शेळके, ज्योतिबा मुंडे,महादेव खराटे, विठ्ठल माने उपस्थित होते.
    पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, महाराजांचे सरदार सकुजी गायकवाड यांनी शत्रु स्त्री सावित्री देसाई यांच्या शी सत्तावीस दिवस लढून गड जिंकला आणि त्याने परत त्या स्त्रीवर अत्याचार केला. महाराजांनी त्याचे डोळे काढून अजिवन कारावासाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे महाराजांच्या मनामनात नैतिक मुल्ये ठासून भरलेली होती.त्यामुळे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूंचा आजच्या तरुणांनी अभ्यास करून आचरणात आणणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परमेश्वर पालकर यांनी केले तर सुत्रसंचालन सागर बाराते व आभार अॅड तानाजी चौधरी यांनी मानले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित होते.
  • माझी नाळ कायम मातृभूमीशी जोडलेली – संतोष राऊत
  • कळंब तालुक्याचे भुमिपुत्र मुंबई येथील कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त संतोष राऊत हे या व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की,मी ग्रामीण भागातच शिक्षण घेतले असुन माझी जडणघडण मुरुड व कळंब तालुक्यातील आहे.त्यामुळे मला माझ्या मातीची व माणसांशी विशेष ओढ आहे.त्यामुळे या भागाच्या विकासासाठी माझे निश्चितच योगदान देणार आहे. यावेळी त्यांनी स्वप्ननगरी शिवजनमोतसव समितीचे आभार मानले.
error: Content is protected !!