खोंदला – येरमाळा येथील विद्यानिकेतन येथे स्काऊट गाईड जिल्हा मेळावा दिनांक 6 फेब्रुवारी 2025 ते 8 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये संपन्न झाला.श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय,खोंदला येथील विद्यार्थिनींनी जिल्हा मेळाव्यामध्ये आयोजित प्रश्नमंजुषा,तंबू सजावट,हस्त कौशल्य व प्रदर्शन,बिन भांड्याचा स्वयंपाक,लोकनृत्य भव्य शेकोटी कार्यक्रम, शोभायात्रा,समूहगीत गायन, सामुदायिक लेझीम या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.प्रश्नमंजुषा स्पर्धा, समूहगीत स्पर्धा,तंबू सजावट स्पर्धा या स्पर्धेमध्ये श्री. शरदचंद्रजी पवार विद्यालय, खोंदलाच्या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक मिळवला.शोभा यात्रेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी लग्नाची वरात वाजत गाजत काढून शोभायात्रेमध्ये रंगत आणली होती.उमरगा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी आणि उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे यांच्या हस्ते स्काऊट गाईडच्या जिल्हा मेळाव्याचे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाले. शाळेतील विद्यार्थिनी शितल शिंदे,प्रियंका उबाळे,तनिष्का उबाळे,शबनम शेख,फिजा शेख, वैष्णवी गालफाडे तेजस्विनी लांडगे,समीक्षा शिंदे,आदिती लांडगे,राजनंदनी नवले,अंकिता मुळीक या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.शाळेच्या मुख्याध्यापिका तथा स्काऊट गाईडच्या प्रमुख श्रीम.संगीता धाबेकर यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.जिल्हा मेळाव्यामध्ये यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थिनीचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगीता धाबेकर व सहशिक्षक महादेव भोंडवे,दीपक राऊत, बालासाहेब मुळे,रोहिदास सर्जेराव,गोविंद चव्हाण यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले