कन्हेरवाडी – जि.प.प्रा.शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त दि.२६ जानेवारी २०२५ रोजी शाळेत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, वेशभूषा,सामुदायिक कवायत,डंबेल्स,घुंगरकाठी, भाषणे व विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कपिल कवडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तर प्रमुख पाहुणे म्हणुन गावचे सरपंच रामराजे जाधव,उपसरपंच विजय चंद्रकांत कवडे,शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ,महिला, गावातील नवयुवक,शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेली विद्यार्थिनी कुमारी दिव्या मच्छिंद्र कवडे या विद्यार्थिनीने नीट परीक्षेला 617 गुण मिळवत इस्लामपूर येथील एमबीबीएस कॉलेजला प्रवेश मिळवल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर शाळेतील शिक्षिका श्रीमती आशा कंगळे यांनी बक्षीस देऊन विद्यार्थिनीचे कौतुक केले.मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या सर्व बक्षिसासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी भरभरून आर्थिक रूपाने सहाय्य केले व त्यातून विद्यार्थ्यांना बक्षीसे खरेदी करण्यात आली. अध्यक्ष कपिल कवडे 1000 रु, उपाध्यक्ष विजयकुमार कवडे 1000 रु, व परसबागेसाठी जाळी,सदस्या सौ.अनिता धनंजय जगताप 2100 रु.सौ.वर्षा विवेकानंद मिटकरी 1000 रु.सौ.प्रतिक्षा संजय सावंत 1000 रु.रामराजे संदिपान हाके 1000 रु.बालाजी सुभाष सूर्यवंशी 1000 रु.शिंदे उन्मेश रंगनाथ 500 रु.कुलकर्णी श्रीकांत प्रकाशराव 500 रु.सौ.खंडागळे अश्विनी प्रदीप 500 रु.व श्रीमती रेशमा शौकत तांबोळी 250 रु.तर बाळासाहेब हाके यांनी 100 वॅटचा एक साउंड बॉक्स शाळेसाठी देऊ केला आहे.या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी ग्रामपंचायत कन्हेरवाडी, ओमकार जाधव,संदेश जाधव व श्रीमती सुजाता सावरकर सावंत यांनी खाऊ भेट दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भंडारे बी.एन.यांनी केले.सुंदर असे सूत्रसंचालन दीपक चाळक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार झोरी एन.व्ही.यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती यांनी सहकार्य तर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका सेवक पवन पवार व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश