कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर सलंग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब. रासेयो आणि आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६/०१/२०२५ रविवार रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘ध्वजारोहन’ कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष शाम खबाले, सहसचिव प्रा.संजय घुले, कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे, संचालक भागवत चोंदे व प्राचार्य शशिकांत जाधवर यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.यावेळी शाम खबाले यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्राचार्य.शाशिकांत जाधवर,आयक्युएसी समन्वयक प्रा.अनिल जगताप व एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.मनिषा कळसकर आणि महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ आणि “स्कूल कनेक्ट भाग 2.0″हे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात आले होते.या उपक्रमात सामुहिक वाचन,ग्रंथालय स्वच्छता,ग्रंथप्रदर्शन,लेखक आणि विद्यार्थी वाचन संवाद कार्यक्रम,वाचन कौशल्य कार्यशाळा,पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा इ.उपक्रम घेण्यात आले होते.या विविध उपक्रमात ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.या वेळी पुस्तक परीक्षण लेखन केलेल्या विद्यार्थ्यांपैकी उत्तम परीक्षण करणा-यांमध्ये प्रथम कु.स्नेहल उत्रेश्वर धावारे, द्वितीय शिवप्रसाद महादेव हिंगे व तृतीय कु.रिंकू सतपाल गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शाम खबाले,सहसचिव प्रा.संजय घुले,कोषाध्यक्ष मा.बाळकृष्ण गुरसाळे,संचालक भागवत चोंदे व प्राचार्य. शशिकांत जाधवर आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आले.परीक्षणाचे काम समितीतील सदस्य प्रा.डॉ.हनुमंत माने,डॉ.अनिल जगताप व प्रा.शफीक चौधरी यांनी पाहिले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य.शशिकांत जाधवर प्रा.डॉ.हनुमंत माने,डॉ.अनिल जगताप, प्रा.शफीक चौधरी,ग्रंथपाल प्रा. डॉ.विद्युलता पवार,प्रा.मनिषा कळसकर,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन