August 8, 2025

डॉ.राकेश जानराव यांची पि.एचडी म्हणजे एस.टी. कर्मचाऱ्यांना प्रेरणा – अँड. कांबळे

  • धाराशिव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवाहन महामंडळात कर्तव्य बजावत असतानी राकेश जानराव यांनी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातून अर्थशास्त्रात डायरेक्ट मिळवणे म्हणजे एस.टी.कर्मचाऱ्यांना प्रेरणा देणारी बाब असून उल्लेखनिय कामगिरी असल्याचे प्रतिपादन चर्मकार संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष अँड.गणपती कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी राकेश जानराव यांनी पी.एच.डी संपादन केल्याबद्दल धाराशिव विधिज्ञ मंडळ व वकील मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.परमेश्वर सुकाळे यांनी केले तर आभार अँड.धर्मराज सोनवणे यांनी मानले.यावेळी अँड. बाळासाहेब पवार,अँड.सतीश राठोड,अँड.महेंद्र सोनवणे,अँड. सुदर्शन डोबाळे,अँड.साब्बीर शेख,अँड.पठाण,अँड.राजूदास आडे,अँड.बाकळे,अँड.अमोल डोंगरे,आसिफ शेख आदीसह बार कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.
error: Content is protected !!