लातूर – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची बैठक दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सिध्दोधन बुद्ध विहार लातूर येथे माजी मंडळ अध्यक्ष संजय नाटकरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या बैठकीमध्ये सन २०२४ चा वार्षिक अहवाल,गडचिरोली येथील नियोजित अधिवेशन आणि लातूर मंडळ व विभागीय कार्यकारणीची निवड करण्यात आली.यामध्ये लातूर मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ कुसभागे, उपाध्यक्ष विनोद पवार (निलंगा), बमन पल्ले (उदगीर), विलास कर्ते (लातूर),कार्याध्यक्ष कपरे डी.एम,संघटक-साबळे बी.एन, सचिव – प्रमोद सोनवणे, सहसचिव प्रमोद कांबळे, कोषाध्यक्ष-बालाजी लांडगे, प्रसिद्धी प्रमुख-बळीराम गायकवाड,महिला प्रतिनिधी- प्रतिभा यादव,लातूर विभाग अध्यक्ष-सचिन दासुद,उपाध्यक्ष- बाळासाहेब गायकवाड (दक्षिण), रवी गायकवाड (उत्तर),चंदन सूर्यवंशी (मुरुड),रमेश सिरसाटे (ग्रामीण),सचिव – बी.आर.ढगे, कोषाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, प्रसिद्ध प्रमुख दिपक सरवदे, महिला प्रतिनिधी सोनाली क्षीरसागर,कार्यकारणी सदस्य सी.जी.मुंडे (लातूर), राकेश सूर्यवंशी (ग्रामीण मुरुड),डी.एम. पांचाळ (रेणापूर) यांच्या निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.या निवडीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून डि.के.गवळी यांनी काम पाहिले.या वेळी झोनल अध्यक्ष-आर.एस. गायकवाड,झोनल उपाध्यक्ष एन.सी.हळगावकर,झोनल सचिव कल्याण मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीसह शेकडो कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
समाजसेवेचा गौरव;सुधाकर रणदिवे यांना लातुरात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव