August 8, 2025

पारा येथे आजपासून आमरण उपोषणास सुरुवात

  • धाराशिव (जयनारायण दरक) – वाशी तालुक्यातील पारा येथे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी राज्यात सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेने व लोकशाहीच्या मार्गाने मागील अनेक दिवसापासून आंदोलने सुरू आहेत. मात्र अद्याप पर्यंत शासनाकडून मागणी मान्य न झाल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे .त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत असून पारा गावात सुद्धा 25 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. यानंतर दि.31 ऑक्टोबर पासून पारा गावात सकाळी दहा पासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येत आहे.या आमरण उपोषणासाठी विकास भराटे, रमेश भराटे ,गणेश भराटे ,नकुल घरत ,श्रीराम भराटे,अभिषेक भराटे,ऋषिकेश भराटे आदी बसणार आहेत .अशा आशयाचे निवेदन प्रशासनास देण्यात आलेले आहे.
error: Content is protected !!