कळंब (माधवसिंग राजपूत)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज एकवटला असून आंदोलन तीव्र होत आहे दिनांक ३० ऑक्टोबर कळंब शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून शहरातील व्यापारी पेठ तसेच फळभाजी विक्रेते, हॉटेल व्यवसायिक यांनी आपले दुकाने बंद ठेवली होती सोमवार आठवडी बाजार भरला नाही तसेच शाळा महाविद्यालय बंद होते तर शासकीय कार्यालय व बँक यामध्ये शुकशुकाट होता कळंब बस आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तालुक्यातील ईटकुर येथे १५ युवकांनी आमरण उपोषण सुरू केली असून याला पाठिंबा म्हणून दररोज साखळी उपोषण सुरू आहे आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाहीत अशी खंबीर भूमिका या युवकांनी घेतली आहे याचबरोबर ईटकुर बंदचे आवाहन करण्यात आले होते. गाव बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला , संग्राम जाधव ,अमरजीत आडसूळ ,आकाश गंभीरे, रोहित गंभीरे या चार तरुणांनी अचानकपणे गावातील हनुमान मंदिराजवळील मोबाईल टॉवरवर उंच शेवटच्या टोकापर्यंत चढून आंदोलन केले त्यांनी एक मराठा एक कोटी मराठा या घोषणा दिल्या त्यांच्या घोषणांना जमलेल्या लोकांनी जोरदार प्रतिसाद दिला त्यांनी खाली उतरावे म्हणून पोलीस निरीक्षक सुरेश साबळे उपनिरीक्षक कांबळे, बीट आमदार पोपट जाधव यांनी विनंती करूनही हे तरुण खाली उतरण्यास तयार झाली नाहीत दिनांक ३१ ऑक्टोबर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे ईटकुर ग्रामपंचायत सरपंच व १३ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत त्याचबरोबर खामसवाडी गावातही कडकडीत बंद पाळण्यात आला व सरकारचा निषेध म्हणून प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले व सरकारच्या वेळ काढून धोरणाचा जाहीर निषेध करीत गावातून रॅली काढण्यात आली व आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारी भाषणे केली या सभेत ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर शेळके व विश्वास कोकणे यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली तसेच गौरगाव येथे साखळी उपोषण सुरू आहे मोहा येथील चौकात आमदार खासदार व पुढारी यांना गाव बंदीचे पोस्टर लावण्यात आली असून आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल अशी भावना तरुण व्यक्त करीत आहेत दिनांक २९ ऑक्टोबर रोजी कडकडीत बंद व रॅली काढून आरक्षणाला विरोध करणाऱ्याचा निषेध करण्यात आला सरसकट मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरंगे पाटील यांनी १७ दिवसाचे अमरण उपोषण केले होते उपोषण सोडताना सरकारने ३० दिवसात मागणीप्रमाणे आरक्षण देण्याचे मान्य केले होते जरांगे पाटील यांनी ४० दिवसाची मुदत दिली होती सरकारने या मुदतीत ठरल्याप्रमाणे आरक्षण जाहीर केले नाही म्हणून मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आमरण उपोषण सुरू केले असून उपोषणाचा सहावा दिवस आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी ठीक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले