August 8, 2025

निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी – योगेंद्र यादव

  • ठाणे – एक देश एक निवडणूक या संकल्पनेचे मूळ उद्दिष्ट हे संपूर्ण देशात एक पक्ष निवडून यावा असे आहे.२०२४ ची निवडणूक लोकसभेची निवडणूक नाही तर भारताच्या संविधानाची निवडणूक आहे.यातून भारताचे भवितव्य स्पष्ट होणार आहे,असे प्रतिपादन स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव ठाण्यात केले.
    संजीव साने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त स्वराज इंडिया आणि स्वराज अभियान ठाणे यांच्यातर्फे २०२४ की चुनौती या विषयावर ठाण्यात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा जिंकला तर, त्यानंतर निवडणुका होणार नाहीत,असा गैरसमज अनेकांना झाला आहे,परंतु असे होणार नाही.यापुढेही निवडणुका होत राहतील. कदाचित
    त्यांचे स्वरूप बदललेले असू शकते. २०२४ ची निवडणूक ही भारताच्या संविधानाची निवडणूक आहे.हे मुळात समजून घेण्याची गरज आहे. मुस्लिमांविरोधात होणारी हिंसा ही काही नवी नाही, परंतु आता जी हिंसा होत आहे,ती रस्त्यावर उतरून केली जात आहे.
  • ‘भारत जोडो यात्रेने वातावरणात बदल’
  • * भारत जोडो यात्रेपासून देशाचे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे.तसेच सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येत स्थापन केलेल्या “इंडिया” या संघटनेमुळे भाजपाच्या पराभवाची आशा वाढली आहे.केवळ या संघटनेतील सर्व पक्षप्रमुखांनी एकत्रित येत त्यांचे विचार बाजूला ठेवून देश वाचविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे.आजही देशात ९० टक्के लेखक असे आहेत की,ते भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात आहेत, असा दावाही त्यांनी केला.
error: Content is protected !!