August 8, 2025

कळंब येथे विरोध करणाऱ्या नेत्यांच्या नावाने गोडजेवण

  • कळंब (महेश फाटक यांजकडून) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. कळंब तालुक्यातील ईटकूर गावात पंधरा युवकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या गावातील नऊ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. तसेच या गावातील विद्यार्थ्यांनी प रक्षांवर बहिष्कार टाकून तात्काळ आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
    मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. कळंब तालुक्यातील इटकुर व परीसरातील गावातील बारा मराठा बांधवांनी आजपासून आमरण उपोषण सुरू
    केले आहे. यामध्ये अभयसिंह आम्ही अडसूळ,लक्ष्मण अडसूळ, सचिन गंभीरे, दादाराव मोटे, विजयसिंह पाटील,रणजित देशमुख, संतोष थोरात,शुभम राखुंडे आदींचा समावेश आहे.तर ईटकूर, तांदुळवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
error: Content is protected !!