कळंब (महेश फाटक यांजकडून ) – राष्ट्रीय स्तरांवर पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारी संघटना व्हाईस ऑफ मिडियाचे १८ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी बारामती येथे होणाऱ्या शिखर अधिवेशनाच्या संदर्भात कळंब शहरातील भाजी मार्केटमधील एम.डी.लाईव्हच्या कार्यालयात सदस्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी राज्य संघटक चेतन कात्रे,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे यांनी होणाऱ्या शिखर अधिवेशनाच्या काही मार्गदर्शक सूचना सांगितल्या तर व्हॉईस ऑफ मीडियाची कळंब तालुका अध्यक्षपदी रणजीत गवळी,कार्याध्यक्षपदी राम रतन कांबळे,कोषाध्यक्षपदी सतीश तवले व संघटक पदी अशोक कुलकर्णी यांची नियुक्ती केली. यावेळी या चारही जणांचा व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होणारा सा.साक्षी पावनज्योतचा विशेषांक व्हॉईस ऑफ मीडिया राज्य संघटक चेतन कात्रे ,मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे,डिजिटल मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष अकिब पटेल,तालुका उपाध्यक्ष श्रीकांत मडके, प्रसिद्धीप्रमुख दीपक माळी,तालुकाध्यक्ष प्रा.अविनाश घोडके,सा.साक्षी पावनज्योत विशेष प्रतिनिधी राजाभाऊ बारगुले,धाराशिव प्रतिनिधी जयनारायण दरक,कळंब शहर प्रतिनिधी महेश फाटक यांच्या हस्ते देवून हार्दिक अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीस तालुक्यातील २५ सदस्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले