धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.10डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 283 कारवाया करुन 2,25,400 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.10.12.2024 रोजी 19.30 वा. सु.कळंब पो ठाणे हद्दीत महादेव स्वीट होमच्या पाठीमागे कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सलीम इब्राहिम बागवान, वय 31 वर्षे, रा.सिमला टायरच्या बाजूला कळंब येथे धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. महादेव स्वीट होमच्या पाठीमागे कळंब येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,120 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.10.12.2024 रोजी 19.30 वा. सु.तुळजापूर पो ठाणे हद्दीत तुळजापूर शहरातील समाधान हॉटेलच्या बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-नागनाथ अरुण सातपुते, वय 26 वर्षे, रा.काटी सावरगाव ह.मु. जीजामात नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 19.30 वा. सु. तुळजापूर शहरातील समाधान हॉअेलच्या बाजूस मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,230 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभी करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
तामलवाडी पोलीस ठाणे :सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायक रित्या वाहने उभे करणाऱ्या चालकांवर तामलवाडी पो.ठा.च्या पथकाने काल दि.10.12.2024 रोजी 17.00 वा.सु.कारवायी केली. यात 1)बस्वराज चंद्रकांत यळकोटे, वय 34 वर्षे, रा. सोलापूर जि. सोलापूर यांनी 17.00 वा. सु. तामलवाडी टोलनाका येथे ॲटो रिक्षा क्र एम.एच. 13 सी.टी. 9680 ही सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो.ठा.येथे गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे:मयत नामे-मारुती अंबादास सोनवणे, वय 55 वर्षे, रा. सुभेदार रामजी आंबेडकरनगर, बार्शी रोड, धाराशिव ता.जि. धाराशिव यांनी दि.08.05.2024रोजी 08.00 वा. सु. त्यांचे राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- गणेश बाळासाहेब बुद्रुक, शैजला बाळासाहेब बुद्रुक,बाळासाहेब सदाशिव बुद्रुक सर्व रा. बार्शी नाका धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी मयत मारुती यांची जमीनीच्या ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे रक्कम देण्यास नकार दिल्याचे कारणावरुन मयत मारुती यांनी नमुद आरोपींचे त्रासास कंटाळून आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महानंदा मारुती सोनवणे, वय 56 वर्षे, रा. सुभेदार रामजी आंबेडकरनगर, बार्शी रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं.कलम- 306,34 सह अ.जा.ज.अ. प्र. का. कलम 3(2) (व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रहिमान उस्मान शेख, वय 31 वर्षे, व सोबत अजय कोडींबा वाघमोडे, संतोष खंडु धर्मे, सचिन कलप्पा कोलगी सर्व रा.येत्नाळ पोस्ट होटगी, ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर हे गाडीमध्ये तुरीचे कट्टे भरुन जात असताना दि.10.12.2024 02.30 ते 03.30 वा. सु. हॉटेल मल्हार लातुर रोड काक्रंबा येथे अनोळखी सहा इसमांनी रहिमान शेख यांची गाडी थांबवून त्यातील एक इसमाने गाडी ताब्यात घेवून रहिम शेख यांना व त्यांचे सोबतचे अजय कोडींबा वाघमोडे, संतोष खंडु धर्मे, सचिन कलप्पा कोलगी यांना लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण करुन गाडीतील तुरीचे 32 कट्टे एकुण 2, 32,800₹ किंमतीचे जबरीने लुटुन पसार झाले. व पोलीसात तक्रार केली तर जिवे ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रहिमान शेख यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310 ( 2), 126(2), 118(1), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-महेश बब्रुवान सुर्यवंशी, वय 41 वर्षे, रा.जाजण मुगळी ता.बस्वकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक यांचे हंद्राळ शिवारातील विहिरीतील लाडा लक्ष्मी कंपनीची 5 एच पी पाणबुडी मोटर ही दि.03.12.2024 रोजी 17.30 ते दि. 04.12.2024 रोजी 08.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महेश सुर्यवंशी यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :दि.10.12.2024 रोजी 02.00 ते 04.00 वा. सु. भवानी चौक, सांजा रोड धाराशिव येथील HITACH PAYMENT SERVICE PVT- LTD या कंपनीच्या ए.टी.एम. मधील रोख रक्कम 5,32,100₹ हे अज्ञात व्यक्तीने कटरच्या सिाय्याने नट कट करुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कल्याणी संदीप सराफ, वय 33 वर्षे, रा. वृंदावन कॉलनी राधिका हॉटेलच्या मागे धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-राहुल दामोधर कोळी, वय 32 वर्षे, रा.विवेकानंद नगर, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे किरणादुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम 50,000₹ हे दि. 27.11.2024 रोजी 11.30 वा. सु. आरोपी नामे-मिलींद फुलचंद सिरसट, रा. पापणास तिर्थ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल कोळी यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-राहुल तिलकराज, वय 21 वर्षे, रा.कुठार कला पोस्ट उना हिमाचल प्रदेश ह.मु. तेरणा कॉलेज समोर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची एच.एफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 03 डीवाय 7788 ज्याचा इंजिन नंबर HA11ERN5B50188 चेसी नंबर MBLHAC040N5B05123 ही दि. 26.11.2024 रोजी 21.30 ते दि. 27.11.2024 रोजी 08.00 वा. सु. तेरणा कॉलेजच्या धाराशिव समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल तिलकराज यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अमोल दशरथ कांबळे,राम भारत मगर,बन्सीलाल भारत मगर,शांताबाई भारत मगर सर्व रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.07.12.2024 रोजी 07.00 वा. सु. पळसप येथे फिर्यादी नामे-जयश्री ज्ञानदेव ताटे, वय 40 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांना व त्यांचे पती, मुलगा व मुलगी यांना नमुद आरोपीने टीव्ही व मोबाईलचा आवाज मोठा करण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, वेळूची काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राम मगर यांनी दि.10.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115, 352, 351, (2), 351(3), 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-स्वप्निल सुनिल तांबे, वय 29 वर्षे, व्यवसाय वकील, रा.सांजा ता. जि. धाराशिव हे दि. 10.12.2024 रोजी 15.00 वा. सु. मा. कोर्ट धाराशिव येथे कोर्टाचे कामकाज करत असताना आरोपी नामे-अभिषेक शाहुराज तिर्थकर रा. धाराशिव यांनी स्वप्निल तांबे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. स्वप्निल तांबे यांच्या पॅन्टच्या खिशातील ॲपल कंपनीचा आय फोन 14 हा बळजबरीने हिसकावून घेवून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-स्वप्निल तांबे यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 304( 1), 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
आनंदनगर पोलीस ठाणे: मयत नामे-अर्णव अजय सोनवणे, वय 14 वर्षे, रा. शांतीनिकेतन नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हा दि.10.12.2024 रोजी 15.30 वा.सु. पोददार इंटरनॅशनल शाळेकडे क्लाससाठी सायकलवरुन जात होता. दरम्यान एनएच 65 रोडवर डी मार्टचे बाजूस पाठीमागून येणारी ट्रक क्र के.ए. 13 बी. 1773 चालक आरोपी नामे-परर्मेश बल्लेश हसन यांनी त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अर्णव सोनवणे यास धडक दिली. या अपघातात अर्णव सोनवणे हा गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुजित वैजीनाथ ओव्हाळ, वय 48 वर्षे, रा. शंकरनगर धाराशिव ता.जि. धाराशिव यांनी दि.10.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला