September 24, 2026

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा भेट देवून मानवी हक्क दिन साजरा

  • कळंब – जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त
    उपविभागीय अधिकारी कार्यालय कळंब येथे लोकहित सामाजिक विकास संस्था व श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी संजय पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.व्ही.चकोर ,तहसीलदार हेमंत ढोकले,पोलीस उपाधीक्षक संजय पवार,पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक उंडगे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पत्रकार बालाजी अडसूळ यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी श्रमिक मानवाधिकार संघाच्या अध्यक्षा सौ.माया शिंदे व सचिव भाई बजरंग भाऊ ताटे उपस्थित होते.यावेळी कळंब व वाशी तालुक्यातील दलितावर होणारे अन्याय दलितांच्या स्मशानभूमीची प्रस्ताव गरोदर महिलांचे प्रश्न ऊसतोड कामगारांचे प्रश्न इत्यादी प्रश्नावर उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्याशी संघटनेचे अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी चर्चा करून निवेदन ही देण्यात आले .
error: Content is protected !!