August 8, 2025

शेतकऱ्यांची कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे अभ्यास सहल

  • कळंब – वॉटरशेड ऑर्गायझेशन ट्रस्ट,अहमदनगर विभाग कळंब चे मार्गदर्शन अंतर्गत इंडसइंड बँक यांचे अर्थसाहाय्यातून ग्रामपंचायत उमरा,परतापूर, दुधाळवाडी,मोहा,शिंगोली, ब्रम्हाचीवाडी,भाटशिरपूर, मलकापूर व मोहा गावातील शेतकरी महिला,पुरुष यांची अभ्यास सहल काढण्यात आली होती.
    सहलीत शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्र,डीघोळआंबा अंबाजोगाई व पशुउद्योजग शेतकरी प्रवीण तोडकर रा. कुंभेफळ यांचे दुग्ध्यवसाय ची पाहणी केली.
    या सहलीमध्ये प्रकल्पा अंतर्गत गावातील एकूण ७५ शेतकरी सहभागी झाले.यावेळी कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईचे सुहास पंके कृषी तज्ञ यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती,गांडूळ खत,बायोगॅस,मुक्त गोठा,शेती अवजारे,शेतीच्या सुधारित पद्धती,पशुखाद्य,नर्सरी इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
    तसेच रा.कुंबेफळ ता. अंबाजोगाई येथील तोडकर यांचे दुग्ध व्यवसायास भेट दिली. आजच्या काळात शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय,मुक्त गोठा पद्धत,जनावरांसाठी चारा व्यवस्थापन,हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास व्यवस्थापन इत्यादीचे सविस्तर मार्गदर्शन मिळाले.
    यावेळी प्रकल्पा अंतर्गत गावातील ग्राम विकास समिती चे अध्यक्ष,सदस्य,महिला,पुरुष वॉटर कळंब ऑफिसचे मनेश फंदे,विशाल जाधव व आशुतोष शिंदे,गावातील वसुंधरा सेवक, महिला प्रवर्तक उपस्थित होत्या.
error: Content is protected !!