लातूर ( विलास ढगे ) – येथील पत्रकार भवनमध्ये शहरातील विविध परिवर्तनवादी संस्था संघटनेच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक नरसिंग घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी झालेल्या चर्चेत येत्या एप्रिल महिन्यात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध वैचारिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे ठरले.या जयंती कार्यक्रमातून देव आणि धर्माचा वापर करून सत्ता मिळविणाऱ्या जातीयवादी राजकीय पक्षापासून बहुजन समाजाने सावध राहावे. संविधान संपुष्टात आणून मनुवादी व्यवस्था आणू इच्छिणाऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला बहुजन समाजाने मतदान करू नये यासाठी समाज जागृतीचे कार्यक्रम घेण्याचे निश्चीत झाले. या बैठकीत महात्मा ज्योतीराव फुले आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर बुध्दीवादी जयंती समिती गठीत करण्यात आली.या समितीच्या अध्यक्षपदी परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते श्रीकांत मुद्दे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सचिव प्रसाद पवार, कोषाध्यक्ष सचिन औरंगे , उपाध्यक्ष प्रा.अर्जुन जाधव, रावणराजे आत्राम, प्रा.डॉ.मारोती गायकवाड,दिलीप गायकवाड, आनंदभाई वैरागे, प्रा.दत्तात्रय सुरवसे, प्रा.बलभीम सातपूते, प्रा. मकबूल शेख, प्रा.कुमार जाधव, सहसचिव गौतम मुळे,आकाश मोठेराव, दत्ता भूरे,मारोती माने, अँड.बी.एस.गाडेकर, सहकोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, निमंत्रक श्रीहरी कांबळे, जी.ए. गायकवाड, संयोजक नरसिंग घोडके,यु.डी. गायकवाड, विकास कांबळे, सल्लागार – प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, प्रा. सुभाष भिंगे, श्रीधर शेवाळे, प्रा.डॉ. अशोक नारनवरे, मोहन कांबळे सेलूकर, राजकुमार होळीकर, कॉ. विश्वंभर भोसले, राजकुमार नामवाड, शिरीष दिवेकर, एकनाथ पलमटे, मधुकर दुवे, बरकत काझी, पांडूरंग आडसूळे, एन.डी. सोनकांबळे, बाबुराव भाले, अँड. किरण कांबळे, अँड. संतोष मस्के, डॉ.शिवाजीराव जवळेकर, दशरथ मस्के,राजेंद्र कांबळे,प्रा. सुधीर अनवले,माधव बावगे,प्रा. युवराज वाघमारे,सुभाष सूर्यवंशी, डी.एस.नरसिंगे,आकाश मोठेराव, प्रा.अर्जुन जाधव, आनंद भाई वैरागी, जी.ए.गायकवाड, प्रा. मारोती गायकवाड, मारुती माने, गौतम मुळे, अँड.अंगद गायकवाड,जी.जी.कांबळे,मोहन कांबळे,जे.टी.शेख,दिलीप गायकवाड,दत्ता सुरवसे सल्लागार – प्रा.डॉ.हर्षवर्धन कोल्हापुरे, अँड. दिपक साठे, सुभाष मस्के, खंडेराव भोजराज प्रा.अशोक गोटमुकले आदी मान्यवरांसह शहरातील विविध भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक प्रा. हर्षवर्धन कोल्हापुरे यांनी केले व मकबुल शेख यांनी सूत्रसंचालन केले तर नरसिंग घोडके यांनी अध्यक्षीय समारोप केला. या बैठकीत महाराष्ट्र शासनानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुररस्कार दिलेल्या कार्यकर्त्याचा आणि जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक चळवळीत काम करणारे स्वाभिमानी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे