धाराशिव (जिमाका) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे करण्यात येते.दि.१६ मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागु झाली आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने तिस-या टप्प्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर केलेला असुन ७ मे २०२४ रोजी ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हयात मतदान होणार आहे.जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.जिल्हयातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.असे आवाहन जिल्हाधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला