August 8, 2025

मराठा समाजाची बैठक उत्साहात संपन्न

  • कळंब- (जयनारायण दरक ) –
    कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे 27 मार्च रोजी सायंकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकल मराठा समाज बांधवाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये काही असे हात उंचावून निर्णय घेण्यात आले या बैठकीत असे निर्णय घेण्यात आले की गावातील मराठा समाज बांधवांनी कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभेला कोणी जायचे नाही आणि धाराशिव लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटील हे जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी उभे राहून सर्व मराठा समाज बांधवांनी व इतर समाज बांधवांनी त्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन व मतदान करून विजयी करायचे असा सर्वानुमते एकमुखी निर्णय घेण्यात आला यावेळी रामराजे जाधव,विजय उर्फ सोनू कवडे, सुधाकर कवडे,विक्रम विजयराव कवडे,आनंत पाटील,धनंजय जगताप,शरद कवडे,महादेव गोविंद कवडे,विजयकुमार कवडे,विक्रम नरसाप्पा कवडे,आनंद जगताप,अमित कवडे,सुरेश मंचिक कवडे,श्रीनाथ मिटकरी,लक्ष्मण कवडे,धनंजय वाळजकर,बळीराम कवडे,चंद्रसेन जगताप,राम शिंदे, बालाजी कवडे,शिवश्री महेश कवडे, सुंदर जाधव, दत्तात्रय कवडे,राहुल शिंदे,शरद वमन, शिवाजी कवडे,संदीप जगताप,संतोष कवडे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तालुक्यात मराठा समाज बांधवांच्या बैठकांचा धडाका सुरू असून या बैठकाचे आमदार खासदारासह राजकीय पुढाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे कारण या राजकीय गाव पुढाऱ्यांना गावातून मताधिक्य देण्यासाठी काट्यावरची कसरत करावी लागणार आहे. कोट्यावधी लोकांना मोफत अन्नधान्य,आनंदाचा शिधा,साडीवाटप हा प्रकार गरीबांचा मदतीचा,सहानुभूतीचा प्रकार नसून,जनतेची सद्सदविवेक बुद्धी संपविण्याचा ऐतखाऊ आणि स्वार्थी बनवून त्यांना लाचार ठेवून त्यांच्या मानसिक मेंदूला गुलाम बनविण्याचा एकप्रकार तंत्र आहे यालाच लोकशाहीचे अपहरण करून हुकूमशाहीचा राजमार्ग तयार करण्याचा प्रकार संबोधला जात आहे मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य आणि हाताला काम हा राजमार्ग शासनाने,पुढाऱ्यांनी,नेत्यांनी का स्वीकारू नये ? कारण ह्या मार्गाची प्रशस्तता म्हणजे पुढाऱ्यांचे,नेत्यांचे मरणच आहे कर्तृत्वान माणूस निर्मितीचा आणि स्वाभिमानी वैचारिकतेचा माणूस जर उभा राहिला तर सरकारमधील हे ढोंगी,मतलबी, स्वार्थी,हुकुमशाही पुढाऱ्यांचे शहाणपणच चालणार नाही म्हणूनच मोफतच्या पोटभरू योजना प्रसुत करून हे पुढारी राज्य सत्तेला सांभाळण्याचा प्रयत्नात असतात हे समजून घेणे आवश्यक आहे जीएसटी सारख्या माध्यमातून करोडोचे उत्पन्न मिळवणे,टॅक्स अगर वस्तूंचे भाव वाढवून एका दिवसात सरकारची तिजोरी भरून घेणे अगर इलेक्ट्रोरल बॉण्डचे माध्यमातून कोट्यावधीची कमाई करून घेणे,नोटबंदी करून करोडोचा भ्रष्टाचार सत्तेचा वापरातून करून घेणे,अशा अनेक प्रकारच्या युक्ती वापरून जनतेला मोफत अन्नधान्य,साडी,गाई,म्हैसी,गॅस शेगडी वाटपाचे माध्यमातून क्रांतीचा आवाज दाबण्याचा अगर गरीब सामान्य हाच क्रांती घडविणारा घटक असल्याने त्यालाच चुप बसविण्याचा,विकत घेण्याचा,लाचार बनविण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे हा त्यांच्या स्वार्थासाठी असतो सर्व जाती-धर्माच्या समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना दानशूर कर्ण संबोधणे अगर प्रामाणिक राष्ट्रभक्त समजण्याची चुक नागरिकांनी करता कामा नये अगर नेत्यांना तत्वनिष्ठ,ध्येयवादी, राष्ट्रभक्त समजण्याची चुक कार्यकर्ते आणि नागरिकांनी करू नये अनाठायी पगार,मानधन,भत्ते घेणारे आणि संडास बांधकामाच्या ठेक्यात सुद्धा कमिशन खाणारे अगर देवा धर्माच्या कामात उपकार दर्शवणारे नेते,पुढारी, कार्यकर्ते,ठेकेदार,अधिकारी हेच मुळात माणुसकीला,लोकशाहीला, धर्माला,देशभक्तीला मारक आहेत. स्वार्थासाठी गट,तट आणि पक्ष बदलणारे अगर त्यांना सामावून घेणारे हे सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत गुंडांचे शेवटचे आश्रयस्थान म्हणजे पुढारपण,राजकारण,सत्तेची खुर्ची आणि अशाच प्रवृत्तींनी सध्या देशाची धुरा हस्तगत केलेली दिसत असून देशाचे भवितव्य अंधकारमय आहे आर्थिक दृष्टीने फाटका,मात्र मनाने दिलदार आणि प्रामाणिक व कर्तृत्वान अशा मनोज जरांगे पाटलांना सर्वांनी पाठबळ,ताकद देऊन त्यांची शक्ती वाढविली पाहिजे असे मराठा व इतर समाजामधुन बोलले जात आहे सहा कोटी मराठ्यांना एकत्रित आणून त्यांना हक्काची व अधिकाराची जाणीव निर्माण करून देणारा हा माणूस खरोखरच अभिमान आहे, स्वाभिमान आहे.अंधारात उजेड निर्माण करणारा हा पेटता दिवा अगर क्रांतीची मशाल यालाच आता सांभाळणे क्रमप्राप्त असून त्यांच्याच आदेशानुसार चालणे हाच विद्यमान काळातला यशाचा प्रभावी आणि न्याय मार्ग आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे राजकारणातील हे सगळे उघडे नागडे आणि निर्लज्ज मात्र सत्तेवर असल्याने यांचे हे नकली मुखवटे आता नागरिकांनी ओळखलेच आहेत म्हणुन सावध व शहाणे होऊन या पुढार्‍यासह नेत्यांना आता संपविलेच पाहिजे तत्वाची,निष्ठेची भाषा आता राजकारणात शिल्लक राहिलेली दिसून येत नाही प्रामाणिक नेत्याला सुद्धा बाजूला सारून अगर त्याला राजकारणातून बाहेर फेकून स्वार्थासाठी सिद्धांत,तत्ववादी आणि ध्येयनिष्ठांची कोंडी करून जनमतावर विश्वास नसल्यानेच जनतेपेक्षा ज्यांनी वर्षानुवर्षे गलिच्छ शब्दांनी टीका केली छळले अशाच अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना जवळ करून व त्यांनाच पुन्हा सन्मान आणि सत्ता प्रदान करून भाजप नेत्यांची बदललेली मनोप्रवृत्ती, यामुळे विचारांची, कार्याची, निष्ठेची, सिद्धांताची,ध्येयधोरणांची दिशाच बदलून गेलेली असल्याने राजकारणाची आता जनतेला चिड येत असून केवळ सत्तेसाठीच सारे काही असाच फॉर्मुला राजकारणात पहावयास मिळत असल्याचे दिसून येते आहे महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व,कर्तृत्व आणि प्रामाणिकपणाचे स्वच्छ आंदोलन हे आता केवळ मराठ्यांनाच नव्हे तर सदगुणांवर ज्यांचा विश्वास आहे आणि प्रामाणिक कर्तुत्वाला जे मानतात अशा अन्य सर्व जाती धर्मांना आता मनोज जरांगे पाटील हे आधाराचे आणि विश्वासार्ह नेते म्हणून वाटू लागले आहेत महाराष्ट्राचे राजकारण म्हणून जरांगे पाटील यांचे शिवाय चालूच शकणार नाही अशा मनोज जरांगे पाटलांचा सार्थ अभिमान राज्या राज्यातील मराठ्यांनी बाळगून स्वतःच्या समाजासह अन्य समाजाला सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील यांचे आदेशाप्रमाणे कृती करण्याचा कृतीपूर्ण ध्यास घेऊन राजकारणात भूमिका घ्यावी असा वर्तमान काळाचा ईशारा आहे असेही नागरिकांमधून बोलले जात आहे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना लाजवेल असा प्रखर आंदोलनकारी आणि प्रामाणिक नेता म्हणून मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या व्यक्तींनी साथ देऊन गलिच्छ, घाणेरडे, तिरस्कारणीय, मतलबी राजकारण आणि भ्रष्ट व स्वार्थी नेत्यांचा पाडाव करून महाराष्ट्राचा स्वाभिमान उंचावला पाहिजे असे समाज बांधवांमधून बोलले जात आहे म्हणून धाराशिव लोकसभेसाठी जरांगे पाटील जे उमेदवार खासदारकीसाठी देतील त्याच उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न तालुक्यातील मराठा व इतर समाजातील बांधव करणार आहेत असे इतर व मराठा समाज बांधवातून बोलले जात आहे व गावोगावी बैठकांचा धडाका सुरू असल्याचे दिसून येत आहे.
error: Content is protected !!